आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सने हा सामना ७ विकेट्सने नावावर केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली, पण यासाठी त्याने अपेक्षेपेक्षा अधिक चेंडू घेतले. याचा परिणाम सीएसकेच्या धावसंख्येवर देखील पाहायला मिळाला.
सुरवातीच्या सामन्यांमध्ये ऋतुराज अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता, पण साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरणाऱ्या ऋतुराजने गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात ४९ चेंडूत ५३ धावा केल्या. अर्धशतक करण्यासाठी त्याला ४४ चेंडू खेळावे लागले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०८.१६ होता.
सलामीसाठी आलेल्या डिवॉन कॉनवे ९ चेंडूत ५ धावा करून बाद झाला, पण ऋतुराजने मात्र संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, नेटकरी मात्र त्याच्या संथगतीच्या खेळीवर नाखुश आहेत आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
https://twitter.com/AtheistArmaan/status/1525798384849694720?s=20&t=eO19j9N8sSn4tKXZdp64tQ
https://twitter.com/Ctrlmemes_/status/1525798351463059456?s=20&t=UDI88FTICxuD0f-8SYbghg
https://twitter.com/Ctrlmemes_/status/1525802286710018049?s=20&t=ysgYzqp0_4SNJr7zSIhN6A
https://twitter.com/AnuragVatsa4/status/1525802026529005570?s=20&t=WxRwrWfrfwW745bINZ4Gaw
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला ५ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १३३ धावा करता आल्या. ऋतुराजने संघाला ही धावसंख्या उभी करण्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान दिले. नवख्या एन जगदीशनने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. मध्यक्रमातील शिवम दुबे (०) आणि एमएस धोनी (७) पूर्णपणे अपयशी ठरले. वरच्या फळीत मोईन अली देखील अवघ्या २१ धावा करून बाद झाला.
गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमीने १९ धावा खर्च करून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. राशिद खान, अलझारी जोसेफ आणिसाई किशोर यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली. फलंदाजी करताना वरच्या फळीतील शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड अनुक्रमे १८ आणि २० धावा करून बाद झाले. सलामीवीर रिद्धिमान साहाने मात्र अर्धशतक केले. त्याने ५७ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बॅटवर स्टिकर लावण्याचे क्रिकेटर्सला किती पैसे मिळतात? जाणून घ्या भारताच्या स्टार खेळाडूंबद्दल
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी
एक लाजरा न साजरा मुखडा…! सारा तेंडूलकर बनली ‘राजकुमारी’, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर






