इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (२९ मे) या हंगामाचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. सायंकाळी आठ वाजता सुरू होणारा हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.
या पंधराव्या आयपीएल हंगामात राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघांच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे, तर अंतिम सामन्यात ते काही जुने विक्रम मोडू शकतात. असेच काही नवनवीन विक्रम या आयपीएलमध्ये केले गेले आहेत. त्यातील काही विक्रम आपण पाहुया.
पंजाब किंग्जच्या लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने या आयपीएल हंगामात षटकारांचा पाऊस पाडला आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ सामन्यांत ३४ षटकार मारले आहेत. तर जोस बटलरने (Jos Buttler) १६ सामन्यांत ४५ षटकार फटकारले आहेत.
इंग्लडचा क्रिकेटपटू लिविंगस्टोन याने आयपीएल हंगामातील सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने गुजरात (३ मे) विरुद्ध मोहम्मद शमीच्या गोलदांजीवर (सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर) ११७ मीटरचा षटकार मारला. या सामन्यात त्याने १० चेंडूत ३० धावा केल्या आणि हा सामना पंजाबने आठ विकेट्सने जिंकला.
आयपीएल २०२२ मध्ये सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज-
११७ मीटर – लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्ज)
११४ मीटर – टिम डेविड (मुंबई इंडियन्स)
११२ मीटर – डेवाल्ड ब्रेविस (मुंबई इंडियन्स)
१०८ मीटर – लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्ज)
१०७ मीटर – जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
१०६ मीटर – लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्ज)
तसेच, आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये एल्बी मोर्केल हा १२५ मीटरसह पहिल्या क्रमांकावर आहे. २००८मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने डेक्कन चार्जर्सच्या प्रज्ञान ओझा विरुद्ध हा षटकार मारला होता.
आयपीएल इतिहासात सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज-
१२५ मीटर – एल्बी मोर्केल, २००८
१२४ मीटर – प्रवीण कुमार, २०११
१२२ मीटर – ऍडम गिलक्रिस्ट, २०११
१२० मीटर – रॉबिन उथप्पा, २०१०
११९ मीटर – क्रिस गेल, २०१३
११९ मीटर – युवराज सिंह, २००९
११९ मीटर – रॉस टेलर, २००८
११७ मीटर – बेन कटिंग, २०१६
११७ मीटर – गौतम गंभीर, २०१७
११७ मीटर – लियाम लिविंगस्टोन, २०२२*
सर्वाधिक बाऊंड्री मारणारे खेळाडू
तसेच या आयपीएल २०२२मध्ये बटलरने षटकार-चौकारांची आतीषबाजी केली आहे. त्याने या हंगामात सर्वाधिक चेंडू सीमारेषेपार पाठवले आहेत. त्यामुळे त्याने आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक चेंडू सीमारेषेपार पाठवण्याचा विक्रम केला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक चेंडू सीमारेषेपार मारणारे (षटकार आणि चौकार मिळून) फलंदाज
१२४ – जोस बटलर (२०२२)*
१२२ – विराट कोहली (२०१६)
११९ – डेविड वॉर्नर (२०१६)
१०८ – क्रिस गेल (२०१३)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कधी तुम्ही जिंकता, कधी हारता, पण…’, आरसीबीच्या चाहत्यांसाठी विराटची हृदयाला भिडणारी पोस्ट
IPL Final । केव्हा आणि कुठे पाहाल गुजरात वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही
वय सोडा, कामगिरी पाहा! आयपीएलमध्ये ‘असा’ कारनामा फक्त धोनी अन् कार्तिकलाच जमलाय, टाका एक नजर