गुजरात टायटन्स संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरातने बी साई सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात त्याने ३५ धावा केल्या आहेत. चेन्नईमध्ये राहणाऱ्या सुदर्शनची कामगिरी पाहून भारताचा वेगवान गोलंदाजी रविचंद्रन अश्विन याने त्याचे कौतुक केले होते.
२० वर्षीय भारद्वाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि आत्तापर्यंत त्याने ३ लिस्ट-ए आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. तसेच त्याने तमिळनाडू प्रीमियर लीगमधील त्याच्या तुफान कामगिरीवर सर्वजण प्रभावित आहेत. त्याने आत्तापर्यंत ४३ चेंडूत ८७ धावा केल्यात, तर २४ चेंडूत ४० धावांची शानदार खेळी खेळली आहे. त्याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये तमिळनाडूसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. तो विजय हजारे ट्राॅफीमध्ये सालामीवीर म्हणून खेळला आहे.
सुदर्शनने सैय्यद मुश्ताक अली ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत देखील सर्वांना खूप प्रभावित केले होते. त्याने तमिळनाडूला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ७ सामन्यांत त्याने एकूण १८२ धावा केल्या होत्या. त्याची तमिळनाडू प्रीमियर लीगमधील कामगिरी पाहून भारताचा गोलंदाज अश्विनने सुद्धा त्याचे कौतुक केले होते. त्याने त्याच्या सोशल मीडिया आकाऊंटवर लिहले होते की, ‘तमिळनाडू क्रिकेटने सुदर्शनला संघात संधी द्यायला हवी.’
सुदर्शन तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चेपाॅक सुपर गिल्लीस या संघासाठी खेळला. आत्ता त्याला आयपीएल मेगा लिलावात गुजरात फ्रॅंचायझीने २० लाख रुपयांना खरेदी केले आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ३० सामन्यात ३५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. गुजरातने आयपीएलच्या १५ व्या हंगामात आत्तापर्यंत ३ सामने खेळले आहेत, या तीनही सामन्यात संघाने विजय मिळवला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेला अकोल्याचा वाघ ‘दर्शन नळकांडे’ आयपीएल गाजवण्यास सज्ज
IPL2022| बेंगलोर वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!