इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला खेळाडू म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा युवा खेळाडू आयुष बडोनी. ज्याने लखनऊ संघासाठी पहिल्याच सामन्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक केले, त्याची कामगिरी पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले. चाहते अजूनही आयुष बडोनीबद्दल चर्चा करत आहेत, परंतु संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने त्याच्याबद्दल वेगळे मत मांडले आहे.
गुरुवारी (३१ एप्रिल)सीएसके विरुद्धच्या सामन्यापूर्वी एका चॅनेलवर संभाषणात गौतम म्हणाला की, ‘उजव्या हाताच्या या युवा फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा करणे खूप घाईचे ठरु शकते आणि चांगली खेळी त्याला सुपरस्टार बनवत नाही.’ आयुषला संघाशी जोडण्यात आणि त्याच्या टॅलेंटला वाव देण्यात गौतमचे मोलाचे योगदान आहे.
पूढे बोलताना गौतम म्हणाला की, ‘आयुषबद्दल बोलणे खूप घाईचे ठरेल. कारण चांगली खेळी सूपरस्टार बनवत नाही. मात्र हा युवा फलंदाज उत्कृष्ट असून, तो बराच काळ रडारवर असल्याचे गौतमने सांगितले. यामुळेच आयुष लखनऊ ड्रेसिंग रूमचा एक भाग आहे. आम्ही त्याची प्रतिभा ओळखली असल्याचे तो म्हणाला आहे. तो दिल्लीचा आहे म्हणून आम्ही त्याला बराच काळ पाहिले. आयुषसाठी सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित असणे ही आहे आणि त्याचा समतोल राखणे हे देखील आमचे काम आहे. आयुषला लखनऊ फ्रँचायझीने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याच्या २० लाख रुपय मूळ किमतीत विकत घेतले आहे.
पहिल्या सामन्यात ५४ धावा केल्यानंतर आयुषने गौतमला सर्व श्रेय दिले आणि सांगितले की, गोतम भैय्याने मला खूप सपोर्ट केला. त्याने मला माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले. त्याने मला फक्त एकच सामना नाहीतर पूर्ण संधी दिली जाईल, असे सांगितले. भैय्याने मला सांगितले की, मला परिस्थितीनूसार खेळण्याची गरज नाही. हे करण्यासाठी संघात अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत. तु फक्त तुझा नैसर्गिक खेळ कर.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या ९ बॉलमध्ये भानुकाने आणला बवंडर! पाहा झंझावाती खेळीचा व्हिडिओ
मलिंगाचा मोठेपणा! स्वतःचाच विक्रम मोडल्यावर ब्रावोला दिल्या ‘खास’ शब्दात शुभेच्छा; लिहिले…
आयपीएल फॅन्ससाठी खूशखबर! आता अधिक क्षमतेचे जाता येणार स्टेडियममध्ये; महाराष्ट्र सरकारने दिली सूट