राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत सलग 2 पराभवांचा सामना केल्यानंतर गुरुवारी (दि. 27 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सला आव्हान देणार आहे. या सामन्यात घरच्या मैदानावर म्हणजेच सवाई मानसिंग स्टेडिअम, जयपूर येथे हा सामना रंगणार आहे. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघाने सलग तीन विजय मिळवले आहेत. तसेच, आणखी एका विजयासह प्ले-ऑफसाठी आपला दावा ठोकण्याचा प्रयत्न करणार आहे. चेन्नईच्या वरच्या फळीत ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे हे शानदार प्रदर्शन करत आहे.
खरं तर, हा सामना चेन्नईच्या फलंदाजांमध्ये आणि राजस्थानच्या जागतिक दर्जाच्या फिरकीपटूंमध्ये आहे. कॉनवे या हंगामात तुफान फॉर्ममध्ये आहे. तो या हंगामात सर्वाधिक यशस्वी फलंदाजांमध्ये सामील आहे. त्याने 7 सामन्यात 314 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त कोलकाताविरुद्ध अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 29 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली होती. त्याने 5 सामन्यात 209 धावांचा पाऊस पाडला आहे. तो 199.04च्या स्ट्राईक रेटने धावा चोपत आहे.
मागील सामन्यात राजस्थानचा विजय
राजस्थानसाठी एक गोष्ट सुखावणारी असेल की, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत जेव्हा त्यांनी चेन्नईचा पहिल्यांदा सामना केला होता, तेव्हा त्यांना विजय मिळाला होता. मात्र, चेन्नईने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या संघाने अखेरच्या षटकात शानदार प्रयत्न करत काट्याची टक्कर दिली होती. मात्र, घरच्या मैदानावर चेन्नईला 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी (दि. 23 एप्रिल) चेन्नईने त्यांच्या मागील सामन्यात कोलकाता संघाविरुद्ध हंगामातील पाचवा विजय मिळवला होता. यासह त्यांनी दहा गुण मिळवले होते. गुरुवारी राजस्थानला पराभूत करत चेन्नई आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
बटलर-यशस्वीवर जबाबदारी
चार वेळा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई संघ राजस्थानविरुद्ध मजबूत दिसत आहे. मागील हंगामात अंतिम सामन्यात पराभूत होणारा राजस्थान दोन पराभवानंतर विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. राजस्थाानला चांगली कामगिरी करायची असेल, तर जोस बटलर, यशस्वी जयसवाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांना बॅटमधून चांगले योगदान द्यावे लागेल. खेळपट्टी संथ असल्यामुळे गोलंदाजांना फायदा होईल. अशात फिरकीपटू आर अश्विन आणि युझवेंद्र चहल चांगली कामगिरी करू शकतात. (ipl 2023 37th match rr vs csk playing xi prediction know captain player list)
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स
जोस बटलर, यशस्वी जयसवाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, ऍडम झम्पा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, महीश थीक्षणा, मथीशा पथिराना, आकाश सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराजचं नशीब फळफळलं! WTC फायनलसाठी टीम इंडियात जागा, द्विशतक ठोकणाऱ्या ‘या’ 2 खेळाडूंचीही चांदी
डब्ल्यूटीसी फायनलसाठी गावसकरांनी निवडली भारताचा प्लेइंग इलेव्हन! 5 फलंदाज आणि 3 गोलंदाजांना संधी