भारतीय आणि गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी आयपीएल 2023 हंगाम शानदार ठरला. गिलने हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान मिळवला. त्याने हंगामात गुजरातच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला. अशात भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने शुबमन गिल याचे कौतुक केले आहे. त्याने गुजरातच्या यशामागे गिल सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, शुबमन गिल (Shubman Gill) याच्यामुळे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ पहिल्या हंगामात चॅम्पियन बनला आणि दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. गिलने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात 17 सामने खेळताना 59.33च्या सरासरीने आणि 157.80च्या स्ट्राईक रेटने एकूण 890 धावा केल्या. यासोबतच ऑरेंज कॅपही मिळवली. तो एका आयपीएल हंगामात खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli) याच्या 973 धावांच्या विक्रमापासून फक्त 83 धावा दूर राहिला.
‘गुजरातच्या यशाचे सर्वात मोठे कारण शुबमन गिल’
विराटने आयपीएल 2016मध्ये एकूण 973 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणताही इतर खेळाडू मोडू शकला नाही. मात्र, आयपीएल 2023 हंगामात गिल विराटचा विक्रम मोडण्याचा जवळ पोहोचला होता. गुजरातने मागील दोन हंगामात मिळवलेल्या यशाविषयी बोलताना चोप्राने मत मांडले. तो म्हणाला की, “गिल एक रोमांचक फलंदाज आहे. त्याचा मागील हंगाम चांगला होता, पण हा एक खूपच चांगला हंगाम होता. त्याला आधी प्रिन्स म्हटले जायचे, पण आता तो प्रिन्स राहिला नाहीये. कारण हा एक नक्कीच किंगचा हंगाम होता. आपण असा दबदबा 2016मध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून पाहिला होता. हा त्याचप्रकारचा हंगाम होता.”
यानंतर त्याने गिलच्या त्या खेळीचे सर्वात जास्त कौतुक केले, जी त्याने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळली होती. त्याविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “तो पुढे जात आहे. विशेषत: मुंबईविरुद्धच्या त्याच्या खेळीत दबदबा पाहायला मिळाला. त्यामध्ये वाटले की, आता तो काहीच चुकीचे करू शकत नाही. तो लोकांना सांगत होता की, कुठे गोलंदाजी करायची आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम एक खूप मोठे स्टेडिअम आहे आणि त्याने इथे खूप षटकार मारले.”
खरं तर, गिलने या हंगामातील क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 60 चेंडूत 129 धावांची खेळी साकारली होती. त्याने त्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला होता. शेवटी गुजरातने मुंबईला 62 धावांनी पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. (ipl 2023 aakash chopra gives biggest credit success gujarat titans shubman gill said this know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी भारताचा निवडकर्ता असतो तर…’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे किशन-भरतविषयी मोठे भाष्य, वाचा काय म्हणाला
हेच आपले संस्कार! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने सर्वांपुढे घेतला धोनीचा आशीर्वाद, पाहा पाया पडतानाचा Video






