इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा एमएस धोनी याच्या नेतृत्वात खेळणार आहे. भारतीय संघासाठी या दोघांनी अनेक वर्ष एकत्र खेळले. पण चेन्नई सुपर किंग्जसाठी यावर्षी पहिल्यांदाच अजिंक्य रहाणे खेळत आहे. रहाणे टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच सलामीवीर म्हणून फलंदाजी करत आला आहे. पण यावेळी त्याला शक्यतो सलामीची संधी मिळू शकणार नाही. हंगाम सुरू होण्याआधी राहणेने सीएसकेसाठी आपली भूमिका काय असणार, हे स्पष्ट केले.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय संघ (Team India) आणि आयपीएलमध्ये नेहमीच पहिल्या क्रमांकावर खेळला आहे. पण यावेळी संघाच्या आवश्यकता पाहून त्याला तडजोड करावी लागू शकते. आपण कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार आहोत, असे स्पष्ट संकेतच अजिंक्य रहाणेकडून मिळाले आहेत. दरम्यान, सीएसकेडे डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड ही सलामीवीर सीएसकेसाठी आगामी हंगामात डावाची सुरूवात करणार, असे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (30 मार्च) पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेला काही प्रश्न विचारले गेले.
सीएसके आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने शुक्रवारी (31 मार्च) आयपीएल हंगामाची सुरुवात होईल. सलामीवीराच्या प्रश्नावर रहाणेने उत्तर दिले, “मी नेहमीच सलामीवीर राहिलो आहे. टी-20 क्रिकेटमध्येही नेहमी डावाची सुरुवात केली आहे. त्यामुळे माझी भूमिका जास्त काही बदणार नाही. पण तरीही संघ व्यवस्थापन आणि कर्णधार मला जे सांगतील, ती जबाबदारी पार पाडण्यास मी नेहमीच तयार असतो. मी नेहमीच संघाच्या विचाराला प्राधान्य देतो. त्यामुळे जेव्हा कधी मला संधी मिळेल, तेव्हा मी सर्वोत्तम योगदान दईल.”
आयपीएल 2023 मोध्ये इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स सीएसकेसाठी खेळणार आहे. पण माध्यमांतील वृत्तांनुसार स्टोक्स फिटनेसच्या कारणास्तव आयपीएलमध्ये गोलंदाजी करणार नाहीये. पत्रकार परिषदेत रहाणेला स्टोक्स आयपीएलमध्ये गोलंदाजी करणार की नाही? असा प्रश्न विचारला गेला. पत्रकारांच्या प्रश्नाला रहाणेने अगदी थोडक्यात उत्तर दिले. “माही भाई त्याचा कसा वापर करून घेतील, हे उद्या तुम्हाला दिसेलच. माही भाईच्या डोक्यात या सर्व गोष्टी आहेत. तो स्टोक्सचा चांगल्या पद्धतीने संघासाठी वापर करून घेईल,” असे रहाणे पुढे म्हणाला. (Ajinkya Rahane on the issue of CSK opener.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनने पाडलाय जो रुटवर प्रभाव! राजस्थानच्या कॅम्पमध्ये इंग्लिश फलंदाज भलताच खुश
CSKच्या गोलंदाजी आक्रमणाला खिंडार! जेमिसननंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज IPL 2023 मधून बाहेर