बुधवारी (दि. 17 मे) आयपीएल 2023चा 64वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात धरमशाला येथे खेळला जाणार आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना पंजाब किंग्स संघासाठी जिंकणे खूपच महत्त्वाचे आहे. तसेच, प्ले-ऑफमधून बाहेर झालेला दिल्ली कॅपिटल्स संघही गुणतालिकेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल. अशात या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर याने शिल्लक राहिलेल्या सामन्यांतील रणनीतीमागील खुलासा केला आहे.
काय म्हणाला आगरकर?
अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हणाला आहे की, त्याचा संघ या हंगामातील उर्वरित सामन्यात विजय आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून मिळवून सकारात्मकरीत्या बाहेर पडेल. आगरकरनुसार, संघ गुणतालिकेत होईल तितक्या वरच्या क्रमांकावर हंगामातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. खरं तर, दिल्ली संघ सध्या प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे.
अजित आगरकरचे वक्तव्य
अजित आगरकर याने हेदेखील मान्य केले की, “उरलेल्या 2 सामन्यात संघ जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आम्ही आमचा दृष्टिकोन बदलणार नाहीत आणि गुणतालिकेत वरच्या स्थानावर हंगाम समाप्त करण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यात आम्ही भरपूर विकेट्स गमावल्या होत्या. आमची सुरुवात चांगली झाली होती, पण आम्ही त्याचा फायदा उचलू शकलो नाहीत. पुढील दोन सामन्यात आम्हाला आमच्या फलंदाजीत या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करू.”
पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्याविषयी आगरकर म्हणाला की, “धरमशाला खूपच चांगले मैदान आहे आणि आशा आहे की, आम्हाला याठिकाणी चांगली फलंदाजी खेळपट्टी मिळेल, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त धावा करू शकू.”
हंगामातील दिल्लीची कामगिरी
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने निराशाजनक प्रदर्शन केले आहे. संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रायली रुसो यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी भरलेला संघ असूनही दिल्ली गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. दिल्लीने आतापर्यंत आयपीएल 2023 स्पर्धेत एकूण 12 सामने खेळले आहेत. त्यातील 8 सामन्यात दिल्लीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे, तर दिल्ली संघ फक्त 4 सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. (ipl 2023 Assistant Coach ajit agarkar reacts on remaining delhi capitals matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! नेट्समध्ये दिसली गुरबाजची ताकद, खतरनाक शॉट खेळताच कॅमेरा बनला निशाणा; Video Viral
रवी शास्त्रींनाच नाहीये निवड प्रक्रियेवर विश्वास! लाईव्ह बैठक घेण्याची केली मागणी, फायदेही सांगितले