क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी टी20 लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)(आयपीएल). याच्या 16 हंगामाचा लिलाव शुक्रवारी (22 डिसेंबर) कोचीन येथे होणार आहे. या स्पर्धेतील दहाही फ्रॅंचायजी या लिलावासाठी उत्सुक आहेत. मागील महिन्यातच पुरूषांचा टी20 विश्वचषक खेळला गेला. त्या स्पर्धेत अनेक संघातील खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली. यामुळे त्या खेळाडूंना कोण आपल्या संघात घेणार याकडे लक्ष असणार आहे.
मागील वर्षी झालेला मोठा लिलाव डोळ्यांचे पारणे फेटणारा ठरला. यंदाचा लिलाव छोटा असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामध्ये आपण कोणत्या संघाच्या पाकिटात किती पैसे, लिलाव कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊ.
या लिलावात 911 खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामधील जवळपास 405 खेळाडूंना खरेदी केले जाईल. सहभागी खेळाडूंमधील 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. ज्यामधील 119 खेळाडू कॅप्ड असून 296 अनकॅप्ड आहेत. सर्व दहा फ्रॅंचायजींनी मिळून एकूण 87 स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी 30 परदेशी खेळाडू असतील. या 10 फ्रॅंचायजींकडे एकूण 174.3 कोटी रुपये आहेत. सनरायजर्स हैद्राबादकडे सर्वाधिक तर कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी पैसे आहेत.
या लिलावामध्येही राईट टू मॅच कार्ड याचा वापर केला जाणार नाही. प्रथम हे कार्ड 2018मध्ये हे वापरले गेले, ज्यामध्ये दुसऱ्या संघाकडून खेळलेल्या खेळाडूला पुन्हा त्याची जुनी फ्रॅंचायजी विकत घेऊ शकत होती. आता हे बंद केले आहे.
ऑक्शनर कोण असणार?
ह्यू एडमीड्स हे ऑक्शनर असून मागील लिलावात त्यांना चक्कर आली होती. तेव्हा चारू शर्मा यांनी लिलाव पुढे चालवला. एडमीड्स यांनी प्रकृती ठिक झाल्याने नंतर ते लिलावात परतले होते.
या लिलावातील युवा आणि वरिष्ठ खेळाडू
अफगाणिस्तानचा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद गझनफर हा या लिलालवातील युवा खेळाडू ठरला आहे, तर भारताचा अमित मिश्रा हा या लिलावातील अधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. 40 वर्षीय मिश्राच्या नावावर आयपीएलमधील मोठा विक्रम आहे. तो आयपीएलमध्ये तीन वेळा हॅट्ट्रीक घेणारा एकमेव गोलंदाज आहे.
𝐂𝐀𝐍. 𝐍𝐎𝐓. 𝐖𝐀𝐈𝐓! ⏳
Just 1️⃣ day to go for the #TATAIPLAuction 2023! 🙌🏻
📍Kochi
🕰️ 2:30 PM IST pic.twitter.com/7F4WrPziCx— IndianPremierLeague (@IPL) December 22, 2022
फ्रॅंचायजींच्या पाकिटामधील रक्कम (रुपयांमध्ये)-
कोलकाता नाईट रायडर्स – 7.05 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – 8.75 कोटी
राजस्थान रॉयल्स – 13.2 कोटी
गुजरात टायटन्स – 19.25 कोटी
दिल्ली कॅपिटल्स – 19.45 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – 20.45 कोटी
मुंबई इंडियन्स – 20.55 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स – 23.35 कोटी
सनरायजर्स हैद्राबाद – 42.25 कोटी
आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार आहे?
आयपीएल 2023चा मिनी लिलाव शुक्रवारी (22 डिसेंबर) ग्रॅंड ह्यात हॉटेलमध्ये होणार आहे.
आयपीएल लिलावाची वेळ काय असणार आहे?
आयपीएल 2023च्या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहे. हा लिलाव पाच ते सहा तास चालण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा लिलावाचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनेलवर होणार आहे?
या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनल आणि हॉटस्टारवर होणार आहे. तसेच तुम्हा जिओ सिनेमावरही हा लिलाव लाईव्ह पाहू शकता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विश्वविजेता’ मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल
बांगलादेशविरुद्ध जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात, यजमानांचे दोन्ही सलामीवीर परतले तंबूत