Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘विश्वविजेता’ मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल

'विश्वविजेता' मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल

December 22, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Lionel Messi

Photo Courtesy: Instagram/ leomessi


विश्वविजेता आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबसोबत नवा करार केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याने या फ्रेंच क्लबसोबतचा करार 2023-24 या नव्या हंगामासाठी वाढवला असल्याचे रिपोर्ट्स पुढे येत आहेत.

लियोनल मेस्सी (Lionel Messi) या 35 वर्षीय खेळाडूने मागील वर्षीच पीएसजीसोबत दोन वर्षाचा करार केला होता. त्याने रविवारी (18 डिसेंबर) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या अंतिम स्पर्धेत फ्रांसविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत दोन गोल करताना पेनल्टी शूटआऊटमध्येही गोल केला होता. हा सामना अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा जिंकला होता आणि तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला होता.

मेस्सी आणखी एक हंगाम पीएसजीसोबत खेळणार असल्याचे फ्रेंच ले पॅरिसियन या वृत्तपत्राने छापले असून त्यांनी यामध्ये क्लबच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव दिले नाही. मेस्सीने या क्लबसोबत खेळताना नुकतेच लीग 1 चॅम्पियनशीप पटकावली आहे. पीएसजीचे अध्यक्ष नासीर एल खलेफी यांनी मेस्सीचा करार वाढवण्याची चर्चा विश्वचषकानंतर केली जाईल असे म्हटले होते. पीएसजीबरोबर इंटर मायामी क्लबही त्याला करारबद्ध करण्यास पुढे आहे, मात्र सध्यातरी त्याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

मेस्सीने पीएसजीकडून खेळताना 12 गोल आणि 14 असिस्ट केल्या आहेत. सध्या पीएसजी युईएफ चॅम्पियन्स लीगच्या अंतिम 16मध्ये पोहोचला आहे. या क्लबकडून खेळण्याआधी तो बार्सिलोना एफसीमध्ये होता. त्या क्लबकडून तो तब्बल 2004-2021 दरम्यान 17 हंगाम खेळला होता. या कालवधीत त्याने 520 सामन्यात खेळताना 474 गोल केले होते. Lionel Messi has told PSG he will extend his contract after FIFA World Cup 2022

मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत 7 बॅलोन दी ओर पुरस्कार जिंकले आहेत. हा पुरस्कार फ्रांस फुटबॉल आणि फिफा मिळून त्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूला देते. त्याचबरोबर मेस्सी फिफा विश्वचषकात दोन वेळा गोल्डन बॉलचा पटकावणारा पहिलाच खेळाडू आहे. अशी कामगिरी त्याने 2014 आणि 2022मध्ये केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्ध जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात, यजमानांचे दोन्ही सलामीवीर परतले तंबूत
Video: सहा वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी20 मध्ये झळकावले होते वेगवान शतक


Next Post
IPL Auction

IPL 2023 Auction: पाकिटातील रक्कम, लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे जाणून घ्या एकाच क्लिकवर

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

भारताच्या टी20 बरोबर वनडे संघाचाही कर्णधार होणार हार्दिक! रोहितचे आता कसे होणार?

Photo Courtesy:iplt20.com

आयपीएलच्या लिलावाआधी सॅम करनला एका गोष्टीचे टेंशन, बेन स्टोक्सशी आहे कनेक्शन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143