ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup)2022च्या जल्लोषात भारताच्या स्थानिक लीगबाबत मोठी माहिती समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल 2023च्या मिनी ऑक्शनचा दिवस ठरला आहे. हा लिलाव 23 डिसेंबरला होणार आहे. यादरम्यान सर्व संघांना जादा 5 कोटी खर्च करण्याची मुभा दिली गेली आहे. याचा अर्थ संघांच्या पॉकेटमध्ये आता 90 ऐवजी 95 कोटी रूपये आहेत.
माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या या सोळाव्या हंगामाचा लिलाव कोचीमध्ये 23 डिसेंबरला आयोजित केला आहे. यासाठी आयपीएलमधील संघांना ज्या खेळाडूंना रिटेन करायचे आहे, त्यांची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करायची आहे. त्याचबरोबर 2023च्या आयपीएलसाठी संघांकडे खेळाडूंना रिटेन करण्याची मर्यादा नाही. यामुळे संघ जेवढे वाटतील तेवढ्या खेळाडूंना रिटेन करू शकतात.
मागील हंगामाच्या लिलावानंतर पंजाब किंग्जने सर्वाधिक पैशांची बचत केली. त्यांनी 3 कोटी 45 लक्ष रुपयांची बचत केली. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सने संपूर्ण पैसे खर्च केले. पंजाब व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्जकडे 2.95 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडे (आरसीबी) 1.55 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 95 लक्ष, कोलकाता नाईट रायडर्सकडे 45 लक्ष, गुजरात टायटन्सकडे 15 लक्ष आणि दिल्ली,मुंबईकडे अनुक्रमे 10-10 लक्ष रुपये बाकी आहेत. IPL 2023 Auction set to be held in Kochi on December 23.
आयपीएलचे मेगा ऑक्शन म्हणजे मोठा लिलाव दोन दिवस होते, मात्र हा लिलाव छोट्या स्वरूपाचा असून तो एकच दिवस चालणार आहे. मागे जेव्हा या प्रकारचा लिलाव झाला त्यामध्ये अनेक संघांनी विदेशी खेळाडूंवरच सर्वाधिक बोली लावली होती.
पंजाब, दिल्ली आणि लखनऊ संघाने 2022मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये केवळ 7 विदेशी खेळाडू घेतले होते, यामुळे कोचीमध्ये होणाऱ्या लिलावात ते अधिक खेळाडू खरेदी करण्याची शक्यता आहे.
नुकतेच फेब्रुवारीमध्ये मोठा लिलाव पार पडला, ज्यामध्ये 204 खेळाडूंची खरेदी झाली. त्यातील 107 कॅप्ड आणि 97 खेळाडू अनकॅप्ड होते. त्यामध्ये 137 भारतीय आणि 67 विदेशी खेळाडूंचा समावेश होता.
यंदा फ्रॅंचायजी अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes), सॅम करन आणि कॅमेरून ग्रीन हे आपली नावे देतात की नाही हे पाहण्यास उत्सुक आहेत. असे झाले तर त्यांची डिमांड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: खुद्द आयसीसीने केले शादाब खानच्या ‘थ्रो’चे कौतुक! एकदा पाहाच पाकिस्तानची विलक्षण फिल्डींग
शाहीन आफ्रिदीने सासऱ्याप्रमाणे राखला तिरंग्याचा मान, भारतीय चाहत्याची इच्छा पूर्ण करत जिंकले सर्वांचे मन