आयपीएल (IPL) 2023चा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचि येथे पार पडला. हा लिलाव सुरू होण्याआधी सनरायजर्स हैद्राबादकडे सर्वाधिक रक्कम होती. तसेच त्यांच्या सर्वाधिक जागाही रिकाम्या होत्या. हैद्राबादकडे 42.25 कोटी रुपये पाकिटात होते, तर 13 जागा रिक्त होत्या. त्याचबरोबर या लिलावात सर्वाधिक महाग खेळाडूंची यादी पाहिली तर पहिल्या दहामध्ये तीन खेळाडू हैद्राबादचेच आहेत. त्यांनी 26.75 कोटी रुपये तर या तिघांवरच खर्च केले. यामुळे 15.5 कोटी रुपये उरले. या उरलेल्या पैशांमध्ये त्यांनी कोणाला खरेदी केले हे आपण पाहुया.
या लिलावात पाचव्या क्रमांंकाचा महागडा खेळाडू हॅरी ब्रूक (Harry Brook) ठरला. ज्याला हैद्राबादने आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल 13.25 कोटी रुपये खर्च केले. त्याचबरोबर त्यांनी या लिलावामध्ये एकूण 4 विदेशी खेळाडूंना खरेदी केले, जी मर्यादा होती.
या लिलावाआधी हैद्राबादने मागील महिन्यात 12 खेळाडूंना बाहेर केले होते. ज्यामध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) याचाही समावेश होता. त्याचबरोबर निकोलस पूरन, प्रियम गर्ग, रोमारियो शेफर्ड, जगदीश सुचित, रविकुमार समर्थ,श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णु विनोद, सौरभ दुबे, सीन एबॉट आणि शंशांक सिंग यांचेही बाहेर केलेल्या खेळाडूंच्या यादीत नाव होते.
कोचिमध्ये झालेल्या लिलावात हैद्राबादने ब्रूकला 13.25 कोटी रुपये आणि मयंक अगरवालला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर हेन्रीच क्लासेनला 5.25 कोटी रुपये आणि आदिल राशिदला 2 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याव्यतिरिक्त हैद्राबादने मयंक मार्कंडेला 50 लाख, विवरांत शर्माला 2.6 कोटी, समर्थ व्यासला 20 लाख, संवीर सिंगला 20 लाख, उपेंद्र यादवला 25 लाख, मयंक डागरला 1.8 कोटी, नीतीश कुमार रेड्डीला 20 लाख,अकील होसेनला 1 कोटी आणि अनमोलप्रीत सिंगला 20 लाख रुपयांना संघात सामील केले.
हैद्राबादने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, एडम मार्करम, अब्दुल समाद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यान्सेन, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, फजलहक फारुकू आणि कार्तिक त्यागी यांचा समावेश आहे.
https://twitter.com/IPL/status/1606331760828112898?s=20&t=R0ArpNSlTRC_0jeqn-gdXQ
मागील आयपीएल हंगामातील हैद्राबादची कामगिरी पाहिली, तर अत्यंत निराशाजनक होती. ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिले. ते 2016 हंगामाचे विजेते राहिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कभी खुशी कभी गम! आधीच्या हंगामात कोटी कमावणारे, आयपीएल 2023मध्ये विकले गेले तुटपुंज्या रकमेवर
कपड्यांप्रमाणे संघ बदलणारा ‘हा’ खेळाडू दिल्लीच्या गोटात, आयपीएलमध्ये झळकावून बसलाय शतक






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर