जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सोळावा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच आयपीएलच्या या नव्या पर्वाची तयारी सुरू झाल्याचे दिसतेय. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) आयपीएलबाबत एक महत्त्वाची बैठक झाली असून, त्यामध्ये आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत.
एका आघाडीच्य क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल व बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये आयपीएल 2023 बाबत काही प्राथमिक निर्णय घेतले गेले. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलचा लिलाव हा ऑगस्ट महिन्याच्या मध्यात आयोजित करण्यात येईल. यासाठी 16 डिसेंबर ही तारीख देखील नक्की करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. खाली लिलाव छोट्या स्वरूपाचा व एकदिवसीय असेल.
या मिनी लिलावात सहभागी होण्यासाठी संघाच्या पर्समध्ये वाढ केली असून, आता सर्व संघ एकूण 95 कोटी रुपये खर्च करू शकतात. आत्तापर्यंत खर्च केलेली रक्कम व शिल्लक असलेली रक्कम ही या एकूण रकमेत पकडली जाईल.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतेच जाहीर केले होते की, यावर्षीपासून आयपीएल पुन्हा एकदा होम आणि अवे अशा पद्धतीने खेळवण्यात येईल. याचाच अर्थ प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर निम्मे सामने खेळायला मिळतील. यासोबतच नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिला आयपीएल आयोजित करण्याबाबत बीसीसीआय गंभीर असल्याचे गांगुली यांनी सांगितले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा