सलगपणे तब्बल 52 दिवस चाललेल्या आयपीएल 2023 च्या साखळी फेरीची रविवारी (21 मे) समाप्ती झाली. अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला पराभूत केल्याने मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली व त्यांना प्ले ऑफ्सचे तिकीट मिळाले. मंगळवारी (23 मे) प्ले ऑफ्सचे सामने सुरू होतील. मात्र, साखरी फेरीत खराब कामगिरी केलेल्या काही भारतीय खेळाडूंचे आता भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता खूप कमी झाली आहे.
भारतीय संघात पुनरागमनची आशा जवळपास संपलेल्या खेळाडूंमध्ये पहिले नाव येते अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याचे. त्याने या हंगामात आरसीबीसाठी 13 सामने खेळताना 11.67 च्या सरासरीने 140 धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याला एकदाही संघासाठी निर्णायक भूमिका बजावत आली नाही. विशेष म्हणजे तो या हंगामात तब्बल चार वेळा शून्यावर बाद झाला. त्याचे वय देखील 38 पेक्षा जास्त झाल्याने भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत.
मागील आयपीएल हंगाम गाजवल्यानंतर भारतीय संघात राहुल त्रिपाठी याला संधी मिळाली होती. आपल्याला मिळालेल्या मर्यादित संधीमध्ये त्याने काही उत्कृष्ट खेळ्या केलेल्या. मात्र, या हंगामात एक अर्धशतक वगळता त्याला आपला प्रभाव पाडण्यात अपयश आले. हैदराबादसाठी खेळताना त्याने त्याने हंगामात 13 सामने खेळताना 273 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांच्यासारखे युवा खेळाडू तो खेळत असलेल्या क्रमांकावर शानदार फलंदाजी करत असल्याने भविष्यात राहुल याला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
मागील वर्षभरात भारतीय संघात सर्वाधिक संधी हर्षल पटेल याला मिळाली होती. मात्र भारतीय संघासाठी मर्यादित वेळाच तो उत्कृष्ट कामगिरी करू शकला. आयपीएलमध्ये देखील त्याचा हाच खराब फॉर्म कायम राहिला. त्याला केवळ 14 बळी मिळवता आले. मोहसीन खान, तुषार देशपांडे व आकाश मधवाल असे युवा गोलंदाज तयार होत असल्याने आता हर्षल क्वचितच भारतीय संघात दिसू शकतो.
(IPL 2023 Bad Performance Will Cost For These 3 Indian Cricketers For Team India Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांना वाटतंय माझा टी20चा स्तर…’, सतत ट्रोल करणाऱ्यांना विराटने एकदाच दिले उत्तर
‘आता वेळ आलीये, विराटने RCB सोडून…’, पीटरसनचा कोहलीला ‘या’ संघाकडून खेळण्याचा सल्ला
सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस