आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ समोरासमोर आले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने एकतर्फी वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीनंतर सलामीवीरांनी दिलेल्या वेगवान सलामीनंतर चेन्नईने 7 गडी राखून विजय संपादन केला.
Match 29. Chennai Super Kings Won by 7 Wicket(s) https://t.co/0NT6FhLKg8 #TATAIPL #CSKvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ब्रुक व अभिषेक शर्मा या जोडीने हैदराबादला 35 धावांची सलामी दिली. त्यानंतर अभिषेक व त्रिपाठी यांनी देखील एक भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आल्यानंतर हैदराबादचा डाव घसरला. त्याने या दोन्ही फलंदाजांना बाद केले. त्यानंतर मयंक अगरवाल देखील जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार मार्करम व क्लासेन हे देखील आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. जेन्सन याने नाबाद 17 धावा केल्याने हैदराबादला 134 पर्यंत पोहोचता आले. चेन्नईसाठी जडेजाने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या जोडीने पुन्हा एकदा शानदार सलामी दिली. त्यांनी 11 षटकात 87 धावा जोडल्या. ऋतुराज दुर्दैवीरीत्या 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणे व रायडू हे देखील फारशी चमक दाखवू शकले नाही. अखेर कॉनवेने नाबाद 77 धावांची खेळी करत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला.
(IPL 2023 Chennai Super Kings Beat Sunrisers Hyderabad By 7 Wickets Jadeja Ruturaj And Conway Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आयपीएल 2023 ची फायनल! क्वालिफायर-एलिमिनेटर ‘या’ शहरात
‘त्या’ गोष्टीसाठी धोनी कधीच देत नाही नकार! सहकाऱ्याने सांगितला थालाच्या दिलदारीचा किस्सा