आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने-सामने आले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
https://twitter.com/IPL/status/1649407217798348801?t=b5eEm6Zd2mFSCdOUTV6QjQ&s=19
चेन्नई सुपर किंग्स सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, हैदराबादने दोन विजय आपल्या नावे केले आहेत. चेन्नईने आपल्या अखेरच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते. तर हैदराबादला मुंबईने पराभवाची चव चाखवली होती. या सामन्यात मोठा विजय मिळवल्यास चेन्नईला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.
उभय संघाची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद
मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महिश तिक्षना.
(IPL 2023 Chennai Super Kings Skipper MS Dhoni Won Toss Sunrisers Hyderabad Batting First)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो हिरा आहे, जो नेहमी जुन्या मित्रांना…’, भज्जीने तोंडभरून केलं रोहितचं कौतुक, तुम्हीही वाचाच
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या साहित्याचा लागला शोध, लाखोंच्या बॅट गेलेल्या चोरीला, दिल्ली पोलिसांनी 48 तासात लावला छडा