मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल 2023च्या उत्तरार्धात एक घातक गोलंदाज जोडला गेला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार मुंबईच्या ताफ्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन जोडला गेला आहे. मुंबई इंडन्समध्ये एका बदली खेळाडूच्या रूपात जॉर्डनला संधी दिली गेल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, जॉर्डन नेमका कोणत्या खेळाडूच्या जागी ताफ्यात सामील झाला आहे, हे अद्याप स्पष्टपणे सांगितले गेले नाहीये.
इएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सने ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याला बदली खेळाडूच्या रूपात संघात सामील केले आहे. पण त्याने संघातील कोणत्या खेळाडूची जागा घेतली आहे, हे अद्याप समोर आले नाहीये. मुंबईच्या ताफ्यातील बहुतांश खेळाडू मागच्या सामन्यापर्यंत फिट दिसले होते. संघात फक्त एकच खेळाडू दुखापतीने त्रस्त आहे, तो म्हणजे जोफ्रा आर्चर (Jofra Archer). नुकतेच आर्चरला शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला हलवण्यात आले आहे. अशात ख्रिस जॉर्डन चालू आयपीएल हंगामात आर्चरच्या जागी खेळू शकतो.
रविवारी (30 एप्रिल) मुंबई इंडियन्सला वानखडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचे आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी आर्चरच्या दुखापतीची माहिती देत तो बेल्जियमला रवाना झाल्याची माहितीही दिली. “होय तो दुखापतग्रस्त आहे. मला विश्वास आहे की, त्याच्यावर होणारी शस्त्रक्रिया जास्त मोठी नसेल. जोफ्रा आर्चर मैदानात काय करू शकतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्या अनेक वर्षांपासून तो एक उत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमाणातही त्याचे वेगळे स्थान आहे.”
मुंबई इंडियन्सकडून अद्याफ जॉर्डन कोणत्या खेळाडूच्या बदली खेळणार, याविषयी स्पष्टता मिळाली नाहीये. जोफ्रा आर्चरऐवजी मुंबईच्या ताफ्यात सध्या डेवॉर्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, कॅमरून ग्रीन, डुआन जेनसन, रिले मेरिडेथ, जेसन हेरनडॉर्फ या विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, यापैकी एकालाही दुखापत झाल्याचे अतापर्यंत समोर आले नाहीये. असात पूर्ण शक्यता अशीच आहे की, ख्रिस जॉर्डर येत्या सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
जॉर्डनने आपला शेवटचा आयपीएल सामना मागच्या हंगामान चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला होता. 17 एप्रिल 2022 रोजी खेळलेल्या या सामन्यात त्याने 58 धावा खर्च केल्या होत्या आणि एकही विकेट घेऊ शकला नव्हता. सीएसकेला या सामन्यात गुजरात टायटन्सकडून 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. जॉर्डनने नुकतीच बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. या मालिकेतील तीन सामन्यात्या त्याला एका विकेटवर समाधान मानावे लागले होते. असात मुंबईसाठी खेळताना त्याचे प्रदर्शन कसे राहणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. (IPL 2023 Chris Jordan has been signed by Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चहल दारुच्या नशेत? नीट चालताही येत नसल्याने घेतला व्यक्तीचा आधार, व्हिडिओ तुफान व्हायरल
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ