चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. 24 मे) खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. या सामन्यात मुंबईला युवा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा याच्याकडून भरपूर अपेक्षा होती. तोही शानदार लयीत फलंदाजी करत होता. मात्र, त्याला नवीन उल हक याच्या चेंडूवर दीपक हुड्डा याने शानदार झेल पकडत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी विकेट घेतल्यानंतर नवीनची रिऍक्शन रागात असल्यासारखी होती. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
झालं असं की, 18व्या षटकातील तिसरा चेंडू नवीन उल हक (Naveen ul Haq) याने धिम्या गतीचा आणि स्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता. या चेंडूवर तिलक वर्मा (Tilak Varma) याने जागेवरूनच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही. त्यामुळे लाँग ऑफवर उभ्या असलेल्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने 24 मीटर धावत शानदार झेल पकडला. त्यामुळे तिलकला तंबूचा रस्ता पकडावा लागला.
यावेळी तिलक वर्मा याने 22 चेंडूंचा सामना करत 26 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 षटकारांचीही बरसात केली. यावेळी विकेट घेतल्यानंतर नवीन कोणाकडे तरी रागाने इशारा करतानाही दिसला. नवीनचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या सामन्यात नवीनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या.
https://twitter.com/Raju88784482906/status/1661397899597725705?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661397899597725705%7Ctwgr%5E6bbe2feff8c8e11379245370fcfae5561da118ce%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2023-deepak-hooda-takes-a-brilliant-running-catch-to-dismiss-tilak-varma-naveen-ul-haqs-reaction-surfaces-watch-video-123262
मुंबईचा डाव
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाकडून 20 षटकात 8 विकेट्स गमावत 182 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान कॅमरून ग्रीन याला मिळाला. त्याने 23 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकार मारत 41 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावांची खेळी साकारली. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी झाली. शेवटी नेहाल वढेरा यानेही 12 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. लखनऊकडून गोलंदाजी करताना नवीनव्यतिरिक्त यश ठाकूर याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच एक विकेट मोहसिन खान यानेही आपल्या नावावर केली. (ipl 2023 cricketer deepak hooda takes a brilliant running catch to dismiss tilak varma naveen ul haqs see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! नवीनच्या माऱ्यापुढे विस्फोटक सूर्या-ग्रीनने टेकले गुडघे, एकाच ओव्हरमध्ये मुंबईचा खेळ खल्लास
मुंबई अडचणीत असताना पंचांनी दिला वादग्रस्त निर्णय! ऑस्ट्रेलियन फलंदाजही नाखुश