मंगळवारी (दि. 9 मे) वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल 2023चा 54वा सामना पार पडला. या रंगतदार सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी उच्च कोटीचे प्रदर्शन केले. हा सामना मुंबईने 6 विकेट्सन सहजरीत्या जिंकला. या विजयात मुंबईचा विस्फोटक फलंदाज नेहाल वढेरा याचेही मोलाचे योगदान होते. विशेष म्हणजे, नेहालने सामन्यादरम्यान एक असा शॉट मारला, जो मैदानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा टियागो गाडीवर जाऊन लागला. त्यामुळे टाटा टियागोला डेंट पडला. नेहालच्या या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेहालच्या जबरदस्त शॉटमुळे टाटा टियागोचे नुकसान
झाले असे की, मुंबईच्या डावातील 11वे षटक आरसीबीचा गोलंदाज वनिंदू हसरंगा टाकत होता. हसरंगाच्या चौथ्या चेंडूवर नेहालने स्लॉग स्वीप शॉट मारला. हा शॉट इतका शानदार होता की, चेंडू मैदानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा टियागो (Tata Tiago) ईव्ही गाडीवर जाऊन पडला. चेंडू लागल्यामुळे गाडीवर डेंटही पडला. मात्र, नेहालच्या या शॉटमुळे नुकसानीपेक्षा जास्त फायदा झाला आहे. खरं तर, गाडीवर चेंडू लागल्यामुळे आता टाटा 5 लाख रुपये दान करणार आहे.
https://twitter.com/HrishabhTiwari7/status/1655994334041477121
आयपीएल 2023 स्पर्धेचे मुख्य प्रायोजक (स्पॉन्सर) टाटाने हंगामाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, जर चेंडू सामन्यादरम्यान गाडीवर लागला, तर कंपनी 5 लाख रुपये दान करेल. हे दान कर्नाटकातील कॉफीच्या शेतांची जैवविविधता वाढवण्यासाठी मदत म्हणून दिले जातील.
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात 20 षटकात 6 विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. या धावा करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 65, तर ग्लेन मॅक्सवेल याने 68 धावांची खेळी साकारली होती. दुसरीकडे, आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 200 धावा करत सामना जिंकला. मुंबईकडून या सामन्यात सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 83 धावा, तर नेहाल वढेरा याने नाबाद 52 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. या विजयासह मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. मुंबईचे सध्या 12 गुण आहेत. (ipl 2023 cricketer nehal wadhera massive six leaves a dent in tiago car against rcb match tata donates 5 lakhs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असतानाही केकेआरसाठी शार्दुल का करत नाही गोलंदाजी? स्वतःच केला महत्त्वपूर्ण खुलासा
फक्त 20 लाखात मुंबई इंडियन्सला मिळाला हिरा! नेहलच्या रूपाने मिटली भविष्याची चिंता






