इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ संघर्ष करताना दिसला. या हंगामात त्याला बॅटमधून खूप खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला कर्णधार डेविड वॉर्नर याने संघाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, आता पृथ्वी शॉ याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. धरमशालेतील आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात पृथ्वी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला. तसेच, त्याने यादरम्यान शानदार सुरुवातही करून दिली आणि हंगामातील आपले पहिल अर्धशतकही साकारले. त्याचा यादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या पृथ्वी शॉ याची बॅट पंजाब किंग्स संघाविरुद्ध चांगलीच तळपली. त्याने यादरम्यान विरोधी संघाचा मुख्य गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डावातील 5व्या षटकात पृथ्वी शॉ अर्शदीप सिंग (Prithvi Shaw Arshdeep Singh) याचा सामना करत होता. यावेळी पहिल्या चेंडूवर अर्शदीपने पृथ्वीला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून चकवले. मात्र, त्यानंतर पृथ्वी अर्शदीपवर चांगलाच भारी पडला.
कारण, पुढील तिन्ही चेंडूंवर पृथ्वीने अर्शदीपला बचाव करण्याची संधीच दिली नाही. पृथ्वीने पहिला पुल शॉट मारला आणि त्यानंतर फ्लिक शॉट खेळून अर्शधीपच्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पृथ्वीने पुन्हा एकदा पुल शॉट मारत चेंडू षटकारासाठी पाठवला. या युवा फलंदाजाचा हा शॉट पाहून चाहते म्हणत आहेत की, पृथ्वी त्याच्या जुन्या लयीत परतला आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
The 𝙎𝙝𝙖𝙬 must go on 💯
Prithvi looks at his explosive best in Dharamsala 🔥#PBKSvDC #TATAIPL #IPLonJioCinema #EveryGameMatters | @PrithviShaw @DelhiCapitals pic.twitter.com/sWnZPuApJU
— JioCinema (@JioCinema) May 17, 2023
विशेष म्हणजे, पृथ्वीने पुढे अशीच वादळी फलंदाजी करत अर्धशतकही साजरे केले. त्याने वैयक्तिक 36व्या चेंडूवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले. मात्र, तो जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला 38 चेंडूत 54 धावा करून तंबूचा रस्ता धरावा लागला. या खेळीत 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. (ipl 2023 cricketer prithvi shaw smashed two four one six against arshdeep singh pbks vs dc )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्ध वॉर्नरचा भीमपराक्रम! बनला IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू; टॉप 3 नावे भारतीय
‘…तर माझा हातच कापावा लागला असता’, लखनऊच्या मॅचविनर खेळाडूचा धक्कादायक खुलासा