हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथील मैदानात पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाब किंग्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दिल्लीला कर्णधार डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करून दिली. पृथ्वी अनेक सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. मात्र, वॉर्नने त्याला संधी देताच त्याने संधीचं सोनं केलं आणि दिल्लीचा चांगला सुरुवात करून दिली. मात्र, वॉर्नर यादरम्यान तंबूत परतला. त्याला पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने झेलबाद केले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शिखर धवनने पकडला शानदार झेल
डेविड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्यात पहिल्या विकेटसाठी तब्बल 94 धावांची भागीदारी झाली. जेव्हा असे वाटत होते की, ही भागीदारी मोठी होईल, तेव्हाच 11व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला.
झाले असे की, सॅम करन याच्या षटकातील या चेंडूवर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने पुढच्या दिशेने धावत हवेत झेप घेतली आणि वॉर्नरचा झेल पकडत तंबूचा रस्ता दाखवला. झेल घेतल्यानंतर धवनने प्रसिद्ध अंदाजही दाखवला. वॉर्नरची विकेट पडताच पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा हीदेखील खूपच खुश दिसली. हे सर्वकाही व्हिडिओत कैद झाले, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Gabbar ka nahi koi muqabla ????????
How good was that catch from Shikhar Dhawan?????#PBKSvDC #IPLonJioCinema #IPL2023 #EveryGameMatters #TATAIPL | @PunjabKingsIPL pic.twitter.com/f0tySNZADO— JioCinema (@JioCinema) May 17, 2023
अर्धशतकाला मुकला वॉर्नर
या सामन्यात शानदार फलंदाजी करत असलेल्या वॉर्नरला अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने 31 चेंडूत 46 धावांची खेळी साकारली. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 5 चौकारही मारले. वॉर्नर यावेळी अर्धशतकाला मुकला, पण त्याने दिल्लीला मजबूती मिळवून दिली आणि धावसंख्या वाढवण्यात मोलाचे योगदान दिले.
वॉर्नरच्या 400 धावा पूर्ण
वॉर्नरने फलंदाज म्हणून आयपीएल 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. त्याने 13 सामन्यातील 13 डावात 430 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतकांचाही पाऊस पडला आहे. मात्र, कर्णधार म्हणून आयपीएलचा हा हंगाम त्याच्यासाठी खास ठरला नाही. दिल्ली संघ आयपीएल 2023 प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. (stunning catch of skipper shikhar dhawan to take david warner warner wicket pbks vs dc ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
4, 4 आणि 6: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या पृथ्वीची बॅट अखेर तळपलीच, अर्शदीपला चोप चोप चोपले; Video Viral
पंजाबविरुद्ध वॉर्नरचा भीमपराक्रम! बनला IPLमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथा खेळाडू; टॉप 3 नावे भारतीय