‘रनमशीन’, ‘किंग कोहली’ अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहली याच्यासाठी आयपीएल 2023 स्पर्धेचा हंगाम चांगला ठरत आहे. विराट हंगामातील सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनला आहे. त्याने गुरुवारी (दि. 18 मे) आयपीएल 2023च्या 65व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खणखणीत शतक झळकावले. हे शतक झळकावताना विराटने कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यासोबत शानदार भागीदारीही रचली. याविषयीच विराटने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांच्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी झाली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 172 धावांची कौतुकास्पद भागीदारी रचली. याचदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावले. त्याने अवघ्या 63 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तसचे, फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यानेही 47 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले.
काय म्हणाला विराट कोहली?
विशेष म्हणजे, मोठी भागीदारी करण्याची विराट आणि फाफची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्यांच्यात शानदार भागीदारी झाली आहे. आरसीबी संघाच्या यशामध्ये या दोघांच्या भागीदारीचा सिंहाचा वाटा आहे. या भागीदारीनंतर विराट म्हणाला की, त्याला फाफ डू प्लेसिससोबत फलंदाजी करताना एबी डिविलियर्स (AB De Villiers) याच्यासोबत खेळल्यासारखे वाटते.
विराट कोहली म्हणाला की, “मला वाटते की, टॅटूमुळे आमची भागीदारी इतकी चांगली होत आहे. आम्ही एकमेकांसोबत या हंगामात 900हून अधिक धावा केल्या आहेत. हे अगदी तसेच आहे, जसे मला एबी डिविलियर्ससोबत फलंदाजी करताना वाटते. आमच्यात चांगली समज आहे की, खेळ कुठे जात आहे आणि काय करणे गरजेचे आहे. फाफ डू प्लेसिसने आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेतृत्व केले आहे. त्यामुळे आरसीबीमध्ये चांगली सुधारणा होत आहे.”
आरसीबीचा पुढील सामना गुजरातविरुद्ध
आरसीबी संघाचा पुढील सामना 21 मे रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील अखेरचा साखळी सामना असणार आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला हा सामना जिंकणे खूपच महत्त्वाचे आहे. आता काय होते, ते या सामन्यानंतरच कळेल. (ipl 2023 cricketer virat kohli compares partnership with faf du plessis to ab de villiers read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊने विराटच्या शतकानंतर ट्वीट करत माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘आता युद्धासाठी तयार व्हा, गंभीर…’
प्रेम हे! विराटने शतक ठोकताच पत्नी अनुष्काने लावला व्हिडिओ कॉल, अभिनेत्रीकडून पतीवर प्रेमाचा वर्षाव