इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार शतकवीर विराट कोहली हा ठरला. विराटने शानदार शतक पूर्ण करत आपल्या संघाला स्पर्धेत कायम ठेवले. त्याचवेळी सामना संपल्यावर विराट हैदराबादच्या युवा खेळाडूंसोबत वेळ घालवताना दिसला.
आरसीबीने हा सामना जिंकल्यानंतर हैदराबादच्या युवा खेळाडूंनी विराटची भेट घेतली. विवरांत शर्मा, नितिश रेड्डी व इतर खेळाडूंनी त्याच्याकडून बॅट, जर्सी व टोपीवर ऑटोग्राफ घेतला. यादरम्यान विराट सर्वांशी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील विराट युवा खेळाडूंची असाच संवाद साधताना दिसलेला. रियान पराग, यशस्वी जयस्वाल व तिलक वर्मा यांच्या सोबत त्याची चर्चा झाली होती.
Virat Kohli signing bats and jerseys for SRH players.
A lovely gesture from the King. pic.twitter.com/U0OCwBnUjD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2023
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेन्रिक क्लासेन याच्या 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 104 धावांच्या जोरावर 186 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्करम (18), हॅरी ब्रूक (नाबाद 27) यांनीही चांगले योगदान दिले. यावेळी आरसीबीकडून गोलंदाजी करताना मायकल ब्रेसवेल याने 2, तर मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली याने 63 चेंडूत 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तसेच, फाफ डू प्लेसिस यानेही 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 71 धावा बनवल. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 172 धावांची भागीदारी केली. हा सामना आरसीबीने 4 चेंडू शिल्लक ठेवत आणि 187 धावा पूर्ण करत 8 विकेट्सने जिंकला.
(Virat Kohli Signed Sunrisers Hyderabad Players Jersey Caps And Bat After Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! विराटने शतक ठोकताच पत्नी अनुष्काने लावला व्हिडिओ कॉल, अभिनेत्रीकडून पतीवर प्रेमाचा वर्षाव
‘कुणीतरी विराटच्या शतकाने…’, प्रसिद्ध पत्रकाराने गंभीरवर पुन्हा साधला निशाणा, लगेच वाचा






