एमएस धोनी याच्यासमोर गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज संदीप शर्मा चांगलाच दबावात दिसला. बुधवारी (12 एप्रिल) खेळल्या गेललेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना चाहत्यांसाठी चांगलाच रोमांचक ठरला. विजयासाठी सीएसकेला शेवटच्या चेेंडूवर षटकार हवा होता. पण संदीप शर्माचा जबरदस्त यॉर्कर धोनी खेळ शकला नाही. परिणामी राजस्थानने हा सामना 3 धावांनी जिंकला सामना संपल्यानंतर संदीपने धोनीचे कौतुक केल.
सीएसकेला या सामन्यात विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते. एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी सीएसकेच्या चाहत्यांना शेवटच्या चेंडूवर्यंत विजयाच्या आशा दाखवल्या. पण संदीप शर्मा (Sandeep Sharma) याने मात्र कसलेली गोलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. धोनीने शेवटच्या षटकात दोन षटकार मारले, पण शेवटचा षटकार त्याला मारता आला नाही. संदीप शर्माच्या मते एमएस धोनी होता म्हणून त्याला षटकातील पहिला षटकार मारता आला. इतर कोणत्याही फलंदाजासाटी असा शॉट मारने सोपी बाब नव्हते.
सामना संपल्यानंतर संदीप आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल सोबत आयपीएलसाठी चर्चा केली. यावेळी संदीप म्हणाला, “मी लसिथ मलिंगाकडून यॉर्कर शिकत आहे. मला असे वाटते की, ज्या चेंडूवर धोनीने षटकार मारला. तो जो पहिला षटकार होता, तो चेंडू खूपच अवघड होता. पण तोदेखील एमएस धोनी आहे आणि त्यामुळे त्याला षटकार मारता आला. याच कारणास्तव मी चांगली गोलंदाजी केली, असे मला वाटते.”
दरम्यान, सामन्यातील शेवटच्या षटकाचा विचार केला, तर मैदानात दबाव होता. संदीप शर्मा देखील दबावात दिसत होता आणि सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईड टाकले. पहिल्या चेंडूवर धोनीने एकही धाव घेतली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र धोनीला लागोपाठ षटकार मारता आले. चौथ्या चेंडूवर धोनीने एक धाव घेतली आणि जडेजा स्ट्राईकवर आला. पाचव्या चेंडूवर जडेजाला देखील मोठा शॉट खेळता आला नाही आणि फलंदाजांनी पुन्हा एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर संघाला पाच धावा हव्या असताना धोनी स्ट्राईकवर आला. पण संदीपने पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी करत सीएसकेला फक्त एकच धाव दिली. परिणामी आरसीबने तीन धावा राखून विजय मिळवला. (Sandeep Sharma’s special reaction in praise of MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुडघ्याच्या दुखापतीची झगडतोय धोनी, तर ‘हा’ वेगवान गोलंदाज दोन आठवड्यांसाठी बाहेर : स्टीफन फ्लेमिंग
कोट्यावधी धोनी प्रेमी जमले एकत्र! सीएसके-राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर घमासान