---Advertisement---

धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल

MS Dhoni Sandeep Sharma
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारणार अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना होती. पण वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने आपला सर्व अनुभव पनाला लावून बुधवारी (12 एप्रिल) राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना जगातली सर्वोत्तम फिनिशर धोनी स्ट्राईकवर होता. पण संदीपने तरीदेखील राजस्थानला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर आपल्या आधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याने धोनीसाठी खास पोस्ट शेअर केली.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून एमएस धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात बुधवारी सीएसकेने 200वा आयपीएल सामना खेळला. धोनी कर्णधाराच्या रूपात सीएसकेसाठी आपला 200वा सामना जिंकेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे असे होऊ शकले नाही. राजस्थानला विजय मिळून दिल्यानंतर संदीपने ट्वीट केले की, “200वा आयपीएल सामना खेळण्यासाठी धोनी पाजीचे अभिनंदन. त्याच्यासोबत मैदानात खेळणे आणि त्याला गोलंदाजी करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर सीएसकेला विजयासाठी 175 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते. डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी संदीप शर्मा आला. या षटकात सीएसकेला विजयासाठी 21 धावांची आवश्यकात होती. मैदानातील दबाव संदीपच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. त्याने सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईड टाकले. त्यानंतर पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवरील धोनीला एकही धाव घेता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र धोनीने सलग दोन षटकार मारले. चौथ्या चेंडूवर धोनीने एक धाव घेतली, तर पाचव्या चेंडूवर जेडेजाने पुन्हा एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली. शेवटच्या चेंडूवर धोनी स्ट्राईकवर होता आणि विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. हा चेंडू संदीपने जबरदस्त यॉर्कर टकला, जो धोनीला देखील खेळता आला नाही. शेवटच्या चेंडूवर सीएसकेला एक धाव मिळाली आणि 3 धावांनी पराभव स्वीकारला. (Special post by Sandeep Sharma for MS Dhoni)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

कोट्यावधी धोनी प्रेमी जमले एकत्र! सीएसके-राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर घमासान
धोनीविरुद्ध खेळताना केलेली ‘ही’ चूक सॅमसनला पडली महागात! आयपीएलकडून मोठी कारवाई

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---