---Advertisement---

दिल्लीच्या विजयासह वॉर्नरचा भीमपराक्रम! रोहितचा अशक्य वाटणारा रेकॉर्ड मोडला, बनला टॉपर खेळाडू

On: शुक्रवार, एप्रिल 21, 2023 11:24 AM
David-Warner-Record
---Advertisement---

गुरुवारी (दि. 20 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 28वा सामना पार पडला. अरुण जेटली स्टेडिअम, दिल्ली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने 4 विकेट्सने हंगामातील पहिला विजय मिळवला. या विजयात कर्णधार डेविड वॉर्नर याने सिंहाचा वाटा उचलला. यासह त्याने 57 धावांची अर्धशतकी खेळी साकारत खास विक्रम नावावर केला. या विक्रमात त्याने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यालाही पछाडले आहे.

डेविड वॉर्नरने मोडला रोहितचा विक्रम
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) या हंगामात शानदार फॉर्ममध्ये असून चमकदार कामगिरी करत आहे. कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने 41 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. यासह तो आयपीएल इतिहासात कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाला. वॉर्नरने कोलकाताविरुद्ध आतापर्यंत 27 सामने खेळताना 44.79च्या शानदार सरासरीने 1075 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1649111599918256128

यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर हा विक्रम होता. रोहितने कोलकाताविरुद्ध 32 सामन्यात 1040 धावा केल्या होत्या. या यादीत विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या नावाचाही समावेश आहे.

आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1075 धावा- डेविड वॉर्नर, विरुद्ध- कोलकाता

1040 धावा- रोहित शर्मा, विरुद्ध- कोलकाता
1029 धावा- शिखर धवन, विरुद्ध- चेन्नई
1005 धावा- डेविड वॉर्नर, विरुद्ध- पंजाब
985 धावा- विराट कोहली, विरुद्ध- चेन्नई

https://twitter.com/IPL/status/1649129458786525184

सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर नितीश राणा याच्या नेतृत्वातील कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 127 धावा केल्या होत्या. यामध्ये जेसन रॉय याच्या सर्वाधिक 43 धावांचा समावेश होता. यावेळी ‘सामनावीर’ ईशांत शर्मा याने 4 षटकात 19 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. कोलकाताच्या 128 धावांचे आव्हान 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले. यामध्ये वॉर्नरच्या सर्वाधिक 57 धावांचा समावेश होता. तसेच, कोलकाताकडून यावेळी वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि नितीश राणा यांनी 2 विकेट्सची कामगिरी केली होती. (ipl 2023 dc vs kkr batsman david warner beats rohit sharma most runs against single opponent in ipl)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! ट्विटरकडून रोहित, विराट अन् धोनीच्या अकाऊंटवर मोठी कारवाई; काय राडा घातलाय वाचाच
IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही प्रामाणिक…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---