डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 हंगामातील 28व्या सामन्यात पहिला वहिला विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 4 विकेट्सने नमवले. या विजयासाठी दिल्लीला तब्बल 3 आठवड्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीने पहिले पाच सामने गमावल्यानंतर त्यांना सहाव्या सामन्यात विजय मिळाला. या विजयानंतर डगआऊटमध्ये बसलेले दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी गुरुवारी (दि. 20 एप्रिल) सुटकेचा निश्वास टाकला. या विजयामुळे गांगुली खूपच उत्सुक होता. याचा प्रत्यय त्याच्या वक्तव्यावरून येतो.
काय म्हणाला गांगुली?
सामन्यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “दिल्लीने पहिला विजय मिळवल्यामुळे खूपच खुश आहे. पहिला विजय मिळवण्याचा दबाव इतका जास्त होता की, डगआऊटमध्ये बसून असे वाटत होते की, जसे काय 25 वर्षांपूर्वी मी माझी कसोटीतील पहिली धाव घेतली आहे. आज आम्ही थोडे लकी होतो. आम्ही यापूर्वीही चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र, फलंदाजी आमच्यासाठी समस्या ठरली होती.”
गांगुली म्हणाला की, “आम्हाला गरज होती की, पुन्हा जाऊन आम्ही कुठे चुकत होतो, हे समजून घ्यावे. फिरकी विभागात आम्ही चांगले होतो. मला माहितीये की, आम्ही चांगली फलंदाजी केली नाहीये. आम्हाला हे पाहावे लागेल की, हे कसे सुधारले जाऊ शकते. आम्ही या खेळाडूंसोबत मेहनत केली आहे आणि त्यांना फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते पृथ्वी शॉ असो किंवा मिचेल मार्श. हे सर्व आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत.”
https://twitter.com/IPL/status/1649125669639704577
सामन्याबद्दल थोडक्यात
ईशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांनी दोन विकेट्स घेत फायदेशीर गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीने कोलकाता संघाला 127 धावांवर सर्वबाद केले. कोलकाताकडून जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) याच्या 57 धावांच्या जोरावर 6 विकेट्स गमावत 128 धावा चोपल्या. तसेच, पहिला विजय मिळवला. असे असले, तरीही या हंगामात पृथ्वी शॉ याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. (ipl 2023 dc vs kkr sourav ganguly on delhi capitals 1st win read here what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजिंक्य रहाणे स्मार्ट क्रिकेटर, त्याने टी20 क्रिकेटमध्ये…’, गोलंदाजांना घडवणाऱ्या दिग्गजाचे वक्तव्य
‘मला आयपीएलमध्ये शेवटच्या 2-3 वर्षात पंजाबकडून खेळायचं होतं…’, माजी दिग्गजाचा मोठा खुलासा