इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 धावांनी विजय मिळवला. हा हैदराबादचा हंगामातील सलग तिसरा पराभव होता. या पराभवानंतर हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा फलंदाजांशी खूपच नाराज दिसला. त्याने सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे.
फलंदाजांनी केले निराश
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydearbad) संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. तसेच, दिल्ली कॅपिटल्सला 144 धावांवर रोखले. मात्र, या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजांनी निराश केले. त्यांनी सुरुवातीलाच संथ सुरुवात केली आणि विजयाचा इरादाही स्पष्ट केला नाही. त्यानंतर अखेरच्या षटकात दबाव वाढला आणि परिणामी पराभवाचा सामना करावा लागला.
काय म्हणाला ब्रायन लारा?
सामन्यानंतर हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा (Brian Lara) म्हणाला की, इतक्या छोट्या आव्हानाचा पाठलाग न करणे योग्य नाहीये. त्याने या पराभवासाठी हैदराबादच्या फलंदाजांना जबाबदार ठरवले. तो म्हणाला, त्यांनी आपले आक्रमक रूप दाखवण्यास खूपच उशीर केला होता. लारा म्हणाला की, “खेळपट्टीमध्ये कशाप्रकारची गडबड नव्हती आणि आम्हाला आमच्या डावादरम्यान अधिक सक्रियता दाखवायला पाहिजे होती.”
पुढे बोलताना लारा म्हणाला की, “आम्ही सर्वकाही अखेरसाठी सोडले. आमच्या फलंदाजांनी पॉवरप्लेचा पूर्ण फायदा उचलला असता, तर मला चांगले वाटले असते. आम्ही त्यांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यात आणि दबाव बनवण्याची संधी दिली.” तो असेही म्हणाला की, “पहिल्या 15 षटकांना खूपच महत्त्व असते आणि तोपर्यंत आम्हाला खूपच चांगल्या स्थितीत यायला पाहिजे होते.”
With vital contributions with both bat and ball, @akshar2026 is the Player of the Match as @DelhiCapitals seal a 7-run win over #SRH. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ia1GLIX1Py#TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/9dsT2Po3yn
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
सामन्याचा आढावा
या सामन्यात दिल्लीच्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 137 धावा केल्या. हैदराबादकडून मयंक अगरवाल (49) आणि हेन्रीच नॉर्किया (31) यांनाच मोठी खेळी करता आली. त्यांच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर यानेही नाबाद 24 धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे दिल्लीने हा सामना 7 धावांनी जिंकला. (ipl 2023 dc vs srh coach brian lara angry over sunrisers hyderabad batting against delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी 3 गुजरातचे, पाहा तुमच्या फेवरेट टीममधील किती खेळाडू संघात
‘तुझ्या वडिलांसोबतही असंच झालेलं, तू…’, अर्जुनला ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचा सल्ला