इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत एका युवा फलंदाजाचं जोरदार कौतुक होत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून शुबमन गिल आहे. गिलने शानदार फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही गिलचे तोंडभरून कौतुक केले. सचिनने भले मोठे ट्वीट करत गिलसाठी कौतुकाचे पूल बांधले. मात्र, गिलचे कौतुक करणे सचिनच्या अंगलट आले आहे. त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने शुबमन गिल (Shubman Gill) याच्या शानदार फलंदाजीचे कौतुक करत ट्वीट केले होते. याव्यतिरिक्त त्याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबद्दलही लिहिले होते. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “या हंगामात शुबमन गिलचे प्रदर्शन अविस्मरणीय राहिले आहे. सलग दोन शतके मारून आपली वेगळी छाप सोडली आहे. पहिल्या शतकाने मुंबईच्या आशा वाढवल्या होत्या, तर दुसऱ्या शतकाने आशा संपवल्या.”
Shubman Gill’s performance this season has been nothing short of unforgettable, marked by two centuries that left an indelible impact. One century ignited @mipaltan‘s hopes, while the other dealt them a crushing blow. Such is the unpredictable nature of cricket!
What truly… pic.twitter.com/R3VLWQxhoT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 28, 2023
सचिनकडून गिलचे कौतुक
सचिन पुढे म्हणाला की, “हाच क्रिकेटचा स्वभाव आहे. शुबमनच्या फलंदाजीबद्दल एका गोष्टीने मला वास्तवात प्रभावित केले. त्याचा स्वभाव, शांत राहणे, धावांची भूख आणि खेळपट्टीवर धावण्याची चपळाई होती.” सचिन तेंडुलकरने गुजरात वि. चेन्नई (Gujarat vs Chennai) संघातील अंतिम सामन्याविषयीही भाष्य केले.
अंतिम सामन्याविषयी काय म्हणाला?
सचिन म्हणाला की, “गुजरात एक मजबूत संघ आहे आणि शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि डेविड मिलर यांच्या विकेट आज रात्री चेन्नईसाठी महत्त्वाच्या असतील. चेन्नईकडेही फलंदाजीत खोली आहे. एमएस धोनी 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. हा अंतिम सामना रंजक असणार आहे.”
यानंतर नेटकऱ्यांनी सचिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने कमेंट करत लिहिले की, “सासऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.” आणखी एकाने लिहिले की, “सारा भविष्याचा खेळ आहे.” अशाप्रकारच्या अनेक मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
Sasur G ne Green Signal de dia hai Gill ko ????
— Waqar Afridi (@WakaAfridi) May 28, 2023
Sachin in his mind: pic.twitter.com/AL4SpyrpJW
— Aarohi Tripathy ???????? (@aarohi_vns) May 28, 2023
Sachin sir to Shubman Gill : pic.twitter.com/RQCimPefmB
— SwatKat???? (@swatic12) May 28, 2023
शुबमन गिलची हंगामातील कामगिरी
गिलने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यात 60.79च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 156.43च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. (ipl 2023 final csk vs gt former cricketer sachin tendulkar trolled on social media for praising shubman gill)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’