---Advertisement---

वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video

On: सोमवार, मे 29, 2023 8:33 PM
Shubman Gill MS Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 शुबमन गिलसाठी जबरदस्त राहिली. गिलने हंगामात सर्वाधिक 890 धावा केल्या. अंतिम सामन्यातही त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सोमवारी (29 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, एमएस धोनी याच्या चवळाईपुढे संघासाठी जास्त मोठी खेळी करू शकला नाही. गिलच्या स्टंपिंगसाठी धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आयपीएळ 2023चा अंतिम सामना पावसामुळे रविवारी (28 मे) होऊ शकला नाही. सोमवारी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला होता. समोवरी अहमदाबादमधील वातावरण साफ असल्यामुळे चाहते आणि दोन्ही संघाचे खेळाडू उत्सुक दिसत होते. शुबमन गिल उपांत्य सामन्यात शतक ठोकून आपल्या संघासाठी मॅच विनर ठरला होता. अंतिम सामन्यातही त्याच्याकडून असेच काहीसे प्रदर्शन अपेक्षित होते. मात्र, 20 चेंडूत 39 धावा करून त्याने विकेट गमावली. सीएसकेचा कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी () याच्या चपळाईमुळे गिलला विकेट गमवावी लागली.

शुबमन गिल अवघ्या तीन धावांवर खेळत असताना त्याला जीवनदार मिळाले होते. तुषार देशपांडेने टाकलेल्या चेंडूवर त्याने दीपक चाहरच्या हातात झेल दिला होता. पण वेगवान गोलंदाजाला हा सोपा झेल पकडता आला नाही. जीवनदान मिळाल्यानंतर गिल सीएसकेसाठी महागात पडणार असेच दिसत होते. कारण त्याने आक्रमक पद्धतीने फलंदाजीला सुरूवात देखील केली होती. पण अशातच डावातील सातव्या षटकात रविंद्र जडेजा () गोलंदाजीला आला. षटकातील शेवटचा चेंडू गिलच्या बॅटजवळून यष्टीपाठी धोनीच्या हातात गेला. धोनीने क्षणाचा विलंब न करता चेंडू स्टंप्सला लावला. डोळ्यांची पापणी झाकण्यासाठी जितका वेळ लागतो अगदी तितक्याच वेळा धोनीने गिलची विकेट मिळवली. यावेळी धोनीकडे यष्टीरक्षक म्हणून असणारा अनुभव दिसून आला.

दरम्यान, धोनीने हंगामातील सर्वोत्तम फलंदाजाला यष्टीचीत केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. वयाच्या चाळीशीत धोनीने दाखवलेली चवळाई पाहून चाहते आश्चर्यचकित आहेत. (IPL 2023 final CSKvsGT Jadeja gets the big fish, What a quick stumping by Dhoni.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित  
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---