इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातच्या सर्व फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 4 बाद 214 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाच्या पहिल्याच षटकात पावसाने हजेरी लावली. पाऊस लवकर न थांबल्यास सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागू शकतो. तसेच, यापुढे एकाही चेंडूचा खेळ न झाल्यास साखळी फेरीत अव्वलस्थानी राहिलेल्या गुजरातला विजेतेपद देण्यात येईल.
या सामन्यात षटकांची कपात करण्यात आली तर, चेन्नईला पंधरा षटकांमध्ये 171 धावा काढाव्या लागतील. त्यानंतर 12 व्या षटकात 143 धावांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. तर, 10 षटकात 123 धावा त्यांना कराव्या लागतील. तर आठ षटकात 101 व 5 षटकात 66 धावांचे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण होऊ शकते.
(IPL 2023 Final Rain Interrupted In CSK Inning D/L Rule Might In Contention)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा