---Advertisement---

जे बात! शमीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, दणादण विकेट्स काढत दाखवून दिला दम; Video

On: मंगळवार, मे 2, 2023 8:41 PM
Mohammed-Shami
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएल 2023चा 44वा सामना गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. मंगळवारी (दि. 2 मे) या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आपल्या भेदक गोलंदाजीने दिल्लीच्या फलंदाजी फळीचा चुराडा केला. त्याने पॉवरप्लेमध्येच 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. दिल्लीचे 5 विकेट्स या अवघ्या 23 धावांवर पडल्या. शमीच्या घातक वेगवान गोलंदाजीचा पहिला शिकार हा फिलिप सॉल्ट बनला. सॉल्टला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शमीने झेलबाद केले. या सामन्यात पॉवरप्लेमध्ये शमीने 3 षटकात 7 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या.

शमीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही शमीने शानदार गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी उपयुक्त सांगितल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर दिल्लीच्या फलंदाजांना जास्त वेळ टिकण्याची संधीच दिली नाही. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आपला इरादा स्पष्ट केला. त्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली.

यादरम्यानचा व्हिडिओ आयपीएलनेही शेअर केला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर चाहतेही त्याचे कौतुक करत आहेत. या चार विकेट्ससह पर्पल कॅपही शमीच्या डोक्यावर सजली आहे.

https://twitter.com/IPL/status/1653408551455567872

https://twitter.com/ImTanujSingh/status/1653406685971775488?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653406685971775488%7Ctwgr%5E2ac362d23877b189546cf31823e3c77c17197ff5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fhindi%2Fsports%2Fnews-ipl-2023-gt-vs-dc-live-score-mohammed-shami-4-wickets-gujrat-titans-vs-delhi-capitals-scorecard-and-updates-4086713

‘या’ 4 खेळाडूंची शमीने काढली विकेट
दिल्लीच्या वरच्या फळीतील फलंदाज शमीसमोर टिकू शकले नाहीत. दिल्लीने एका पाठोपाठ एक अशा 4 विकेट्स गमावल्या. शमीच्या 3 षटकातच या 4 विकेट्स पडल्या. शमीने पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर फिलिप सॉल्टला डेविड मिलर याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या शिकारच्या रूपात रायली रुसो याला 8 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर तिसरी विकेट मनीष पांडेच्या रूपात घेतली. तो 4 चेंडूत फक्त 1 धाव करू शकला. त्यानंतर शमीने प्रियम गर्ग यालाही तंबूचा रस्ता दाखवला. दिल्लीचे 5 खेळाडू 23 धावसंख्येवर तंबूत परतले. दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याला राशिद खानने नो-बॉलवर धावबाद केले. (ipl 2023 gt vs dc pacer mohammed shami 4 wickets see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमन गिल हा फिरकीपटूंविरुद्ध खेळणारा मास्टर’, भारताच्या दिग्गज स्पिनरचे मोठे भाष्य
‘मी मागे हटणार नाही, हे माझ्या रक्तात…’, विराटसमोर सव्वाशेर का बनतोय नवीन? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---