आयपीएलच्या मैदानात मंगळवारी नवख्या साई सुदर्शन याने अर्धशतक ठोकत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. आयपीएल 2023 मधील गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने हार्दिकचा हा निर्णय नेहमीप्रमाणे योग्द देखील ठरवला. गुजरातने ज्या सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी केली, त्यामुळे शंघाला बहुतांश वेळा विजय मिळाला आहे. ही आकडेवारी खरोखर जबरदस्त म्हणता येऊ शकते.
आयपीएल 2022 (IPL 2023) मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ नव्याने या स्पर्धेत जोडले गेले. मागच्या हंगामात गुजरातने धमाकेदार प्रदर्शन करत विजेतेपद देखील पटकावले. आयपीएलमध्ये गुजरातने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये पहिल्या डावात गोलंदाजी केली आहे. या 10 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये गुजरातला विजय तर फक्त एका सामन्यात पराभव मिळाला आहे. एकट्या मुंबई इंडियन्सने गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करून देखील विजय मिळवला आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ जेव्हा कधी गुजरात संघावर आली, तेव्हा संघाची विजयाची टक्केवारी 90.9% इतकी राहिली आहे.
आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स
विजयी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
विजयी विरुद्ध पंजाब किंग्ज
विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
विजयी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
विजयी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स
विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स
विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
विजयी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स*
दरम्यान, दिल्ली आणि गुजरात संघात मंगळावीर झालेल्या सामन्यावर नजर टाकली, तर नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिकने दिल्ली प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांमध्ये 8 बाद 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 18.1 षटकात 4 बाद 163 धावा केल्या. मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी गुजरातसाठी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजांमध्ये युवा साई सुदर्शन याने 48 चेंडेूत 62 धावांची नाबाद खेळी केली. डेविड मिरने पुन्हा एकदा फिनीशरची भूमिका चोख पार पाडली. मिरलने अवघ्या 16 चेंडूत 31 धावा केल्या. (Chasing the target, Gujarat Titans have won 9 out of 10 matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहमदनगर पाठोपाठ मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स प्ले-ऑफस साठी पात्र
राहुल तेवतियाचा जबरदस्त झेल पाहून पंचांनाही पडला प्रश्न, व्हिडिओ जोरदार व्हायरल