रविवारी (9 एप्रिल) रिंकू सिंग याने केलेल्या प्रदर्शनानंतर केकेआरचा हा फलंदाज रातोरात स्टार बनला. रिंकूने संघाला 5 चेंडूत 28 धावांची आवश्यकता असताना सलग पाच षटकार मारले आणि विजय मिळवला. या अविश्वसनीय खेळीसाठी सर्वोत्र त्याचे कौतुक झाले. आज रिंकूला हे यश मिळाले असले, तरी इथपर्यंतचा त्याचा प्रवास मात्र नक्कीच सोपा नव्हता. अगदी हालाकिच्या परिस्थितीत रिंकून क्रिकेटचा सराव केला आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. दरम्यान, केकेआरने या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला.
रिंकू सिंग (Rinku Singh) एका गरीब कुटुंबातून येतो. त्याचे वडील घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे काण करायचे. अवघ्या दोन खोल्यांचे त्यांचे घर होते, ज्यामध्ये रिंकू सिंग वाढला. कुटुंब आर्धिक दृष्ट्या मजबूत नसल्यामुळे रिंकू सिंगनेही घरी आर्थिक हातभार लावण्याचा विचार अनेकदा केला. माहितीनुसार एकदा त्याने यासाठी सफाई कामगार होण्याचा निर्णयही घेतला होता. पण त्याच्या नशिबात काहीतरी मोठी कामगिर लिहिली होती, असे आपण म्हणू शकतो. या प्रवासात केकेआरकडून त्याला नेहमीच पाठिंबा मिळाल्याचेही तो अनेकदा म्हणाला आहे.
त्याने हा निर्णय बदलला आणि पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीच्या काळात त्याने यूपी संघाकडून 16 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा खेळल्या. नंतर सेंट्रल झोनकडून खेळताना त्याने रणजी क्रिकेटपर्यंत मजल मारली. रिंकूने रणजी क्रिकेटमध्ये आपले नाव केले आणि 2017 मध्ये त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये संधी मिळाली. पंजाब किंग्जने त्याला खरेदी केले होते, पण एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. 2018 हंगामापूर्वी त्याने मुंबई इंडियन्ससाठी ट्रायल देखील दिली पण त्याची निवड झाली नाही. अखेर याच हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 80 लाख रुपये देत ताफ्यात सामील केले. एप्रिल 2018 मध्ये त्याने आरसीबीविरुद्ध आपला पहिला आयपीएल सामना खेळला.
अपयशी ठरल्यानंतरही केकेआरने रिकेटे केले –
केकेआरसाठी रिंकू सुरुवात्याच्या दोन-तीन हंगामांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पण तरीही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत संघात कायम ठेवले. यादरम्यानच 2021 मध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर संशय उपस्थित केले जाऊ लागला होता. या कठीण काळात केकेआर संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. यादरम्यान सुमारे सहा महिने तो मैदानातून बाहेर होता. त्यावेळी घरात रिंकू एकटाच कमावता असल्याने ही दुखापत कुटुंबासाठी देखील चिंतेची बाब होती. पण रिंकूने शस्त्रक्रिया झाल्यानंतर मैदानात चांगले पुनरागमन केले. आयपीएल 2022 हंगामात त्याने केकेआरसाठी चमकदार कामगिरी केली. चालू हंगामत देखील त्याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा आहेत. रविवारी त्याने 21 चेंडूत 48 धावा केल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. (Struggling journey of Rinku Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाजीगर रिंकू झाला भावूक! म्हणाला, “शेतकरी वडिलांनी केलेल्या त्यागाने इथपर्यंतचा प्रवास”
पंजाबला नमवत सनरायझर्सने खोलले विजयाचे खाते! मार्कंडे-त्रिपाठी ठरले नायक