इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 22 एप्रिल पहिला सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. झालेल्या या सामन्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर गुजरातने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर 7 धावांनी एक थरारक विजय मिळवला.
Match 30. Gujarat Titans Won by 7 Run(s) https://t.co/TtAH2CiXVI #TATAIPL #LSGvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात शुबमन गिल बाद झाल्याने गुजरातला धक्का बसला. कर्णधार हार्दिक पंड्याने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाची जबाबदारी स्वीकारली. हार्दिक संथ खेळत असताना वृद्धिमान साहाने आक्रमक खेळ दाखवला. त्याने 47 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील इतर फलंदाज मात्र पूर्णतः अपयशी ठरले. अशा परिस्थितीत हार्दिक अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर उभे राहत एक संयमी अर्धशतक झळकावले. त्याने केलेल्या 66 धावांच्या जोरावर गुजरातने 135 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघाने देखील संयमी सुरुवात केली. मेयर्स 19 चेंडूंवर 24 धावा करून बाद झाला. कृणाल पंड्याने देखील 23 धावा केल्या. राशिद खान व नूर अहमद या अफगाणिस्तानच्या फिरकी जोडीने टिच्चून मारा करत लखनऊला दबावात आणले. यादरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या दोन षटकात 17 धावांची गरज असताना आधी मोहम्मद शमी व त्यानंतर मोहित शर्मा यांनी अतिशय लाजवाब गोलंदाजी करत संघाला सात धावांनी विजय मिळवून दिला.
(IPL 2023 Gujarat Titans Beat Lucknow Supergiants By 7 Runs Hardik Pandya Shami Mohit Sharma Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच