आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (13 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला गेला. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने पंजाबला थरारक सामन्यात मात दिली. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर शुबमन गिलने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने सामना 6 गडी राखून आपल्या नावे केला.
Match 18. Gujarat Titans Won by 6 Wicket(s) https://t.co/qDQuP8ecgd #TATAIPL #PBKSvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
गुजरातला आपल्या मागील सामन्यात केकेआरविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तर पंजाबला हैदराबादने एकतर्फी मात दिलेली. पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी या दोन्ही संघांना विजय हवा होता. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शमीने पहिल्या षटकातच प्रभसिमरनला बाद केले. धवनही 8 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मॅथ्यू शॉर्ट याने आक्रमक 34 धावा केल्या. मात्र, राजपक्षे याच्या बॅटवर चेंडू नीट येत नव्हता. तो 26 चेंडूवर 20 धावा करत बाद झाला. जितेश शर्मा, सॅम करन व शाहरुख खान यांनी अखेरच्या षटकात प्रयत्न केल्याने पंजाबची धावसंख्या 153 पर्यंत गेली. गुजरातसाठी मोहित शर्माने 2 बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना साहा व गिलने 4.4 षटकात 48 धावा काढल्या. साहा 30 धावा करत बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन हा देखील चांगली सुरुवात मिळाल्यानंतर 19 धावा करून तंबूत परतला. कर्णधार हार्दिक पंड्याला मात्र अपयश आले. एका बाजूने गिलने दमदार अर्धशतक ठोकले. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी केवळ सात धावा हव्या होत्या. मात्र, सॅम करनने गिलला बाद करत सामन्यात रंगत आणले. दोन चेंडूत चार धावांची आवश्यकता असताना राहुल तेवतिया याने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातचा हा तिसरा विजय ठरला.
बातमी अपडेट होत आहे…
(IPL 2023 Gujarat Titans Beat Punjab Kings By 7 Wickets Mohit Sharma Shubman Gill Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“तो निःसंकोचपणे नंबर 1”, भारतीय दिग्गजाने बटलरवर उधळली स्तुतीसुमने तब्बल 935 दिवसानंतर आयपीएल रणांगणात उतरला धोनीचा ‘हुकमी एक्का’! यावेळी हार्दिकने दिली संधी