रविवार, 7 मे क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक राहिला. गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असे दोन रोमांचक सामने रविवारी आयोजि केले गेले होते. दुपारच्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
लखनऊला या सामन्यात विजयासाठी 228 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या पाच षटकांमध्ये लखनऊला विजयासाठी 98 धावांची आवश्यकता होती आणि तेव्हाच संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी 62 धावा हव्या होत्या. गुजरातला मिळालेल्या विजायचे श्रेय सलामीवीर शुबमन गिल (Wriddhiman Saha) आणि रिद्धिमान साहा (Shubman Gill) यांना जाते. साहाने 81, तर गिलने नाबाद 94 धावांची खेली केली. लखनऊसाठी सलामीलीवर जोडी कायल मेयर्स (Kyle Mayers) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. पण या दोघांच्या विकेटनंतर लखनऊला धावांची गती राखता आली नाही.
गुजरातसाठी साहा आणि गिलव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहीत शर्मा देखील मॅच विनर ठरला. मोहितने या सामन्यात आपल्या चार षटकात 29 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लखनऊसाठी गोलंदाजी आक्रमातील मोहसिन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. या दोघांव्यतिरिक्त लखनऊच्या आठ पैकी पैकी एकही गोलंदाजाला विकेट मिळू शकली नाही.
लखनऊची सलामीवीर जोडी डी कॉक आणि कायल मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली होती. चालू आयपीएल हंगामातील डी कॉकचा हा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये त्याने 41 चेंडूत 70 धावा केल्या. मेयर्सने 32 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले आणि संघासाठी पहिला झटका ठरला. या विजयानंतर गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या, तर लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे लखनऊने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. (Gujarat Titans won by 56 runs in the match against Lucknow Super Giants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपरमॅनलाही मागे टाकणारी चपळता दाखवत राशिद खानने पकडला ‘कॅच ऑफ द इअर’, ‘हा’ व्हिडिओ तुम्ही सतत पाहाल
घरच्या मैदानात राजस्थान ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांकडून ‘या’ 2 खेळाडूंचे IPL पदार्पण