---Advertisement---

घरच्या मैदानात राजस्थान ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांकडून ‘या’ 2 खेळाडूंचे IPL पदार्पण

On: रविवार, मे 7, 2023 7:12 PM
RR-vs-SRH
---Advertisement---

रविवारी (दि. 7 मे) आयपीएल 2023मधील 52वा सामना राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक राजस्थान संघाने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेला राजस्थान संघ हा सामना जिंकून स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवरील या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात एक महत्त्वाचा खेळाडू सामील झाला आहे. तो खेळाडू म्हणजेच इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) होय. रूट या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघातही काही बदल आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रूक याच्या जागी ग्लेन फिलिप्सची संघात एन्ट्री झाली आहे. तसेच, विव्रांत शर्मा हादेखील आयपीएल पदार्पण करत आहे. (Rajasthan Royals have won the toss and have opted to bat IPL 2023)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल

सनरायझर्स हैदराबाद
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को यान्सेन, विव्रांत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपरमॅनलाही मागे टाकणारी चपळता दाखवत राशिद खानने पकडला ‘कॅच ऑफ द इअर’, ‘हा’ व्हिडिओ तुम्ही सतत पाहाल
‘शतक ठोकण्याचा विचार डोक्यात होता, पण…’, सेंच्युरी हुकल्यानंतर गिलची रोखठोक प्रतिक्रिया; लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---