इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट यावर्षी पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग खेळताना दिसणार आहे. संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2023 साठी त्याला संघात सामील केले होते. रुट आगामी हंगाम सुरू होण्याआधी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याने नुकतेच संघाची जर्सी देत रुटचे स्वागत केले. रुटनेही संघासोबत जोडले गेल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि संघातील खेळाडूंचेही कौतुक केले. खासकरून कर्णधार सॅमसनचा रुटवर चांगलाच प्रभाव असल्याचे जाणवले.
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम शुक्रवारी (31 मार्च) सुरू होणार असून राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आपला पहिला सामना रविवारी (2 एप्रिल) खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात राजस्थानसमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. तत्पूर्वी जो रुट (Joe Root) याने आपल्या संघातील रविचंद्रन अश्विन, रियान पराग आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांचे कौतुक केले.
एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रुट म्हणाला की, “मागचे वर्षी राजस्थान रॉयल्ससाठी खास होते. मी संजू सॅमसनच्या फलंदाजाची नेहमीच आनंद घेत आलो आहे. तो खूप प्रतिभावान आहे, असे मला वाटते. तो एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून प्रत्येक वर्षी अधिक सुधारणा करत आहे.” रुटच्या मते राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये अगदी घरच्यासारखे वातावरण आहे.
जो रुट पुढे म्हणाला, “याठिकाणी अगदी घरच्यासारखे वातावरण आहे. लिलावात संघाने मला खरेदी केल्यानंतर माझे चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मैदानातील प्रदर्शनापेक्षा अधिक चांगले वातावरण बनवण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असतो. मी आगामी हंगामासाठी तयार आणि माझे योगदान देण्यासाठी तयार आहे.” मागच्या वर्षी सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. संघाकडे आपली दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. पण गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभव मिळाला आणि दुसऱ्या आयपीएल ट्रॉफीचे राजस्थानचे स्वप्न अपूर्ण राहिले. (Joe Root praises Sanju Samson’s batting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताकडे रोहित, विराट आणि धोनी होत, पण…’, सरफराज अहमदने सांगितली चॅम्पियन ट्रॉफी विजयाची कहानी
मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीवर संकट! पहिल्या सामन्याला मुकणार ‘एवढे’ खेळाडू