गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वलस्थान गाठले आहे. गतविजेता गुजरात संघ या हंगामात धमाल कामगिरी करताना दिसत आहे. गुजरातने शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत केले. या विजयाचा हिरो जोशुआ लिटल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, जोशुआ हा आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारा आयर्लंड संघाचा पहिला-वहिला खेळाडू ठरला आहे. यानंतर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल (Joshua Little) याने आयपीएल 2023च्या 39व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 25 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या. त्याने वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांची विकेट काढली.
From the first match of today's double-header, it was Josh Little who received the Player of the Match award for his match-winning spell 👏🏻👏🏻@gujarat_titans sealed a 7-wicket win in Kolkata 👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/SZJorCvgb8 #TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/6AT0Lv90g1
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
गुजरात टायटन्सने कोलकातावर 13 धावा शिल्लक ठेवत 7 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 179 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत 180 धावा केल्या.
सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर जोशुआ लिटल याने मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याशी चर्चा केल्यामुळे त्याला फायदा मिळाला. तो म्हणाला, “सामन्यापूर्वी मी हार्दिक पंड्याशी चर्चा केली आणि आम्ही याबाबत चर्चा केली होती की, गोष्टी सहज आणि सोप्या ठेवायच्या आहेत. योजना एवढीच होती की, हार्ड लेंथवर गोलंदाजी करायची. मी तसे करू शकल्यामुळे खुश आहे.”
जोशुआ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत आहे. त्याने आपल्या अनुभवाबाबतही चर्चा केली. तो म्हणाला की, “हंगामातील पहिल्या सामन्यात नेहमीच भिती असते. मी आता चांगल्याप्रकारे सेट झालो आहे.” जोशुआने ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीविषयी म्हटले की, “खेळपट्टी पाहिल्यानंतर मी फक्त बॅक ऑफ द लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला त्याचे काम करण्याची संधी दिली.”
या विजयासह गुजरात संघ आयपीएल 2023च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, कोलकाता संघ 9 सामन्यातील सहाव्या पराभवानंतर गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला. (ipl 2023 joshua little statement after win against kkr)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीला दिल्लीत हरवल्यानंतर SRHचा कॅप्टन भलताच खुश, सामन्यानंतर म्हणाला, ‘मला काहीच अडचण नाही…’
धक्कादायक! आशिष नेहराने अवघड जागेवर मारली लाथ, वेदनेने तडफडताना दिसला माजी संघसहकारी, पाहा व्हिडिओ