बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने यजमान संघाला डोके वर काढू दिले नाही. फलंदाजांनी उभारलेल्या 200 धावांचा बचाव करताना केकेआरच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना रोखले. 21 धावांनी मिळवलेल्या या विजयासह केकेआरने चार सामन्यांनंतर आपल्या पराभवाची मालिका खंडित केली.
Match 36. Kolkata Knight Riders Won by 21 Run(s) https://t.co/o8MipjFKT1 #TATAIPL #RCBvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. केकेआरला जेसन रॉय व जगदीसन यांनी 83 धावांची सलामी दिली. रॉयने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार राणा व व्यंकटेश अय्यर यांनी आणखी एक भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेर रिंकू सिंग व डेव्हिड विजे यांनी दिलेला आक्रमक उपयुक्त योगदानाच्या जोरावर केकेआरने 200 धावा उभ्या केल्या. आरसीबीसाठी विजयकुमार व हसरंगाने प्रत्येकी दोन बळी टिपले.
या धावांचा पाठलाग करताना आरसीबीला विराट व प्लेसिस यांनी दोन षटकात 30 धावा करून दिल्या होत्या. मात्र तिसऱ्या शतकात सुयश शर्मा यांनी प्लेसिस व पाचव्या षटकात अहमद यांना तंबूचा रस्ता दाखवला. ग्लेन मॅक्सवेल ही मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करत झुंज दिली. परंतु तो बाद झाल्यानंतर त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करू नसल्याने आरसीबीला पराभव पत्करावा लागला. केकेआरसाठी वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. त्यालाच सामनावीर घोषित केले गेले.
(IPL 2023 KKR Beat RCB By 21 Runs Jason Roy Suyash Sharma Varun Chakravarthy Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता विराट धावा करण्यासाठी झगडणार…’, एका वक्तव्यामुळे अनन्या पांडे ट्रोल
RCBvsKKR । विजयकुमार वैशाकच्या घातक यॉर्करवर केकेआरचा सेट खेळाडू त्रिफळाचीत । पाहा VIDEO