आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (4 मे) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा अखेरच्या षटकाचा थरार पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज असताना वरूण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत हैदराबादला विजयापासून वंचित ठेवले.
Match 47. Kolkata Knight Riders Won by 5 Run(s) https://t.co/xYKXAE6NDg #TATAIPL #SRHvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली होती. रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय व व्यंकटेश अय्यर हे केवळ 35 धावा धावफलकावर असताना तंबूत परतले. त्यानंतर रिंकू सिंग व कर्णधार नितिश राणा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. रसेलने आक्रमक 24 धावा केल्या. रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले. नटराजन व जेन्सनने प्रत्येकी 2 बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 172 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्सचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 54 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर ऐडन मार्करम व हेन्रिक क्लासेनने 70 धावांची भागीदारी करत यजमान संघाला सामन्यात आणले. त्यानंतर लागोपाठ बळी गेल्याने हैदराबाद संघ पुन्हा माघारला गेला. अब्दुल समदच्या खांद्यावर अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र, वरूण चक्रवर्तीला अखेरचे षटक देण्याचा मोठा निर्णय नितीश राणा याने घेतला. हा निर्णय योग्य ठरवत त्याने संघाला पाच धावांनी विजय मिळवून दिला.
(IPL 2023 KKR Beat Sunrisers Hyderabad By 5 Runs Rinku Singh Varun Chakravarthy Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केदारने सांगितली आयपीएल कमबॅकची कहाणी! म्हणाला, “मी कॉमेंट्री करत होतो आणि…”
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी