रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी भारताचा अनुभवी फलंदाज केदार जाधव याला करारबद्ध केले आहे. जखमी अष्टपैलू डेव्हिड विली याच्या जागी त्याला संधी देण्यात आली. आयपीएल लिलावात विकला न गेलेल्या केदारचे पुनरागमन सर्वांना चकित करणारे होते. आयपीएल दरम्यान समालोचन करत असलेल्या केदारला अचानक कशी संधी मिळाली, याबाबत त्याने स्वतः खुलासा केला आहे.
स्पर्धेचा निम्मा हंगाम उलटून गेल्यावर केदारला आरसीबीमध्ये निवडले गेले. डेव्हिड विली मायदेशी परतल्याने त्याला ही जागा मिळाली. या करारानुसार त्याला 1 कोटी रुपये देण्यात येतील. आपल्या या पुनरागमनाविषयी बोलताना तो म्हणाला,
“मी समालोचन करत होतो. त्यावेळी संजय बांगर यांचा मला कॉल आला. काय करतो असे विचारल्यानंतर मी समालोचन करतोय असे सांगितले. त्यांनी सराव सुरू आहे का आणि फिटनेस कसा आहे असे विचारल्यानंतर, मी आठवड्यातून दोनदा सराव करत असून, फिटनेस आहे असे उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी मला मी पुन्हा कॉल करेल असे सांगितले.”
त्याने पुढे बोलताना म्हटले,
“मी त्यावेळीच समजलो की कदाचित मला संधी मिळेल. मी पूर्ण आश्चर्यचकित व उत्साहित होतो. संघाचे विजयासाठी मी 110 टक्के प्रयत्न करेल.”
केदार आयपीएलमध्ये विकला न गेल्यानंतर समालोचन करत होता.
केदार याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने आत्तापर्यंत 93 सामन्यांमध्ये 1196 धावा केल्या आहेत. केदारने आपले आयपीएल पदार्पण 2010 मध्ये दिल्ली डेअरडेविल्ससाठी केलेले. त्यानंतर कोची टस्कर्स केरला, आरसीबी, दिल्ली, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी त्याने आपले कौशल्य दाखवले. 2016 व 2017 अशी दोन वर्षे तो आरसीबीचा भाग राहिला आहे.
(Kedar Jadhav Told His IPL 2023 Comeback Story Sanjay Bangar Role)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीपची केली वाताहात! टी20 तील सर्वात लाजिरवाणा विक्रम सिंगच्या नावे