केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेची थाटात सुरुवात केली होती. लखनऊने आपल्या पहिल्याच आणि स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 50 धावांनी लोळवलं होतं. मात्र, आपल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध विजय मिळवण्यात अपयश आलं. चेन्नईने चेपॉक स्टेडिअमवर राहुलसेनेचा 12 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर राहुलने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
केएल राहुल (KL Rahul) याने पॉवरप्लेमध्ये केलेल्या खराब गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला की, त्यांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली नाही. याव्यतिरिक्त त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच्या निर्णयालाही योग्य ठरवले.
‘पॉवरप्लेमध्ये खराब गोलंदाजी’
या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा कर्णधार केएल राहुल याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “नाणेफेक जिंकल्यानंतर आमची सुरुवात चांगली राहिली नाही. आम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली नाही. चेन्नईला वादळी सुरुवात मिळाली. जेव्हा विरोधी संघाकडे चांगले फलंदाज असतील, तर तुम्हाला चुकांचा परिणाम सहन करावा लागतो. सहा षटकात 70 धावांच्या आसपास धावा करू देणे योग्य नव्हते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही चांगली गोलंदाजीही केली, पण काही ठिकाणी चुका झाल्या. आमचे अनेक फलंदाज सीमारेषेवर झेलबाद झाले. असे सातत्याने होत नाही. काईल मेयर्स जबरदस्त फॉर्ममध्ये येत आहे. वेस्ट इंडिजसाठीही तो अशाचप्रकारे वादळी फलंदाजी करत होता. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय योग्य होता.”
सामन्याविषयी थोडक्यात
चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअम (Chepauk Stadium) येथे आयपीएल 2023 स्पर्धेचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 217 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाने संपूर्ण षटके खेळून 7 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 205 धावाच केल्या. त्यामुळे चेन्नईला हंगामातील पहिला विजय मिळवण्यात यश आले. तब्बल 4 वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरलेल्या चेन्नईने चाहत्यांनाही निराश केले नाही.
For his match-winning all-round performance in @ChennaiIPL's first home game of the season, Moeen Ali receives the Player of the Match award 🙌🏻#CSK registered a 12-run victory over #LSG 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/C4sEj6ezNC
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
आता चेन्नईचा पुढील सामना शनिवारी (दि. 8 एप्रिल) पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (ipl 2023 kl rahul reacts on lsg defeat vs chennai Super Kings 6th match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीसेनेच्या विजयाने बदलून टाकला पॉइंट्स टेबल, जाणून घ्या कुणाकडे आहे ऑरेंज अन् पर्पल कॅप
‘मी का हसू, मी तर गंभीर आहे’, धोनीने गगनचुंबी षटकार मारताच उतरलं गौतमचं तोंड; नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल