शनिवारी (15 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनऊमध्ये आमना सामना झाला. होम ग्राउंडवर खेळताना केएल राहुल याच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सला पंजाबकडून दोन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी लखनऊचा कर्णधार राहुल मात्र सामन्यात चमकला. राहुलने फलंदाजाच्या रूपात अर्धशतक केलेच. पण क्षेत्ररक्षक म्हणून एक अप्रतिम झेल पकडला.
पंजाब किंग्जला या सामन्यात विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 19.3 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर पंजाबने हे लक्ष्य गाढले आणि हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला. लखनऊने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. लखनऊसाठी सलामीला आलेल्या केएल राहुल (KL Rahul) याने 56 चेंडूत 74 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 159 धावांपर्यंत पोहोचवली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झगडावे लागले.
पंजाबच्या डावातील 16व्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड गोलंदाजी करत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या जितेश शर्मा (Jitesh Sharma) याने कव्हर्सच्या दिशेने शॉट खेळला. राहुने देखील जबरदस्त चवळाई दाखवत डाईव्ह मारली आणि झेल पकडला. राहुलचा हा झेल सथ्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यष्टीरक्षक फलंदाजा जितेश शर्मा याला अवघ्या 2 धावा करून राहुलमुळे पवेलियनमध्ये परतावे लागले.
That catch has ???????????????????? written all over it!
Superb piece of athleticism from the @LucknowIPL skipper ????
Follow the match ▶️ https://t.co/OHcd6VfDps #TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/kDdPK1SEE0
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर लखनऊसाठी राहुलव्यतिरिक्त कायल मेयर्सने सर्वाधिक 29 धावा केल्या. नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे पंजाब किंग्जसाठी या सामन्यात नेतृत्व करू शकला नाही. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करनने पंजाबची कमान सांभाळली. पंजाबसाठी करनने 3, तर कागिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. पंजाब संघ फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर अथर्व टेड आणि प्रभसिमरन सिंग यांनी शुन्य आणि 4 धावांवर विकेट गमावली. पण पुढच्या तीन फलंदाजांनी पंजाबचा डाव सांभाळला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सिकंदर रजा () याने सर्वाधिक 57 धावा केल्या आणि पंजाबच्या विजया महत्वाची भूमिका बजावली. शाहरुख खान याने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या 10 चेंडूत नाबाद 23 धावा कुटल्या आणि पंजाबला विजय मिळवून दिली. (KL Rahul took an amazing catch in the match against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबच्या विजयात शाहरुख-सिकंदर शो! लखनऊ सुपरजायंट्सचा घरच्या मैदानावर पहिला पराभव
वानखेडेवर होणार नारीशक्तीचा जागर! WPL जर्सी आणि हरमन दिसणार टॉसला, मुंबई इंडियन्सचा कौतुकास्पद उपक्रम






