कोलकाता नाईट रायडर्स संघाने घरच्या ईडन गार्डन्स मैदानावर दणदणीत विजय मिळवला. सोमवारी (दि. 8 मे) आयपीएल 2023च्या 53व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात कोलकाता संघाकडून रिंकू सिंग याने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत पंजाबला 5 विकेट्सने पराभूत केले. या विजयात कोलकाताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत 5वे स्थान पटकावले. तसेच, प्ले-ऑफच्या शर्यतीत पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवले आहे.
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पंजाबने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने 5 विकेट्स गमावत 182 धावा केल्या. तसेच, 5 विकेट्सने सामना जिंकला.
रिंकूचा विजयी चौकार
पंजाबच्या आव्हानाच पाठलाग करताना कोलकाताकडून कर्णधार नितीश राणा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 51 धावांची वादळी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेल याने 42 आणि इम्पॅक्ट प्लेअर जेसन रॉय याने 38 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, संघाला अखेरच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना रिंकू सिंग याने चौकार मारत संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. तसेच, रहमानुल्लाह गुरबाज (15) आणि वेंकटेश अय्यर (11) यांनीही दोन आकडी धावसंख्या केली.
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू राहुल चाहर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धवनची दमदार खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून कर्णधार शिखर धवन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. शाहरुख यावेळी नाबाद राहिला. तसेच, ऋषी धवन (19), लियाम लिव्हिंगस्टोन (15) आणि प्रभसिमरन सिंग (12) यांनीही छोटेखानी दोन आकडी धावा केल्या.
यावेळी कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 26 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हर्षित राणाने 2, तर सुयश शर्मा आणि कर्णधार नितीश राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2023 Kolkata Knight Riders won by 5 wkts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावं तेवढं कमीच! KKRचा खेळाडू वेदनेने विव्हळत असताना धवनने केली मदत, व्हिडिओ जिंकेल मन
धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून