मंगळवारी (दि. 16 मे) आयपीएल 2023चा 63वा सामना लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी एकमेकांची भेट घेतली. यादरम्यान रोहित शर्मा आणि गौतम गंभीर भलतेच आनंदी दिसले. आता त्यांच्या भेटीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडिओत आनंद दिसले दिग्गज
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर (Rohit Sharma And Gautam Gambhir) दोघेही खळखळून हसत आहेत. यावेळी ते दोघेही आनंदी दिसत आहेत. गंभीरने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, “तुला पाहून चांगले वाटले रोहित.”
https://www.instagram.com/reel/CsTIiomIW63/
या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, एक लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. याव्यतिरिक्त 2 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “7 आयपीएल ट्रॉफी एकाच फ्रेममध्ये.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “ही दोस्ती आम्ही तोडणार नाही.” आणखी एकाने लिहिले की, “तुमच्या वरिष्ठांचा आदर करा.”
दोन्ही संघांची स्थिती
आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफ शर्यतीत जागा मिळवण्यासाठी हा सामना लखनऊ आणि मुंबई दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वा आहे. रोहित शर्माचा संघ मुंबईने 12 सामन्यात 7 विजय आणि 5 पराभवांचा सामना केला आहे. यासह त्यांनी 14 गुण मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, लखनऊ संघाने 12 सामन्यात 6 विजय आणि 5 पराभव पत्करले आहेत. तसेच, 1 सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्याचा एक गुण अशा एकूण 13 गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान काबीज केले आहे. आता हा सामना जिंकत कोणता संघ आपली जागा मजबूत करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl 2023 lsg vs mi gautam gambhir was very happy to meet mi skipper rohit sharma see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा क्रिकेट कळायला लागले, तेव्हापासून विराटच माझ्यासाठी…’, शतक झळकावल्यानंतर गिलचे मोठे भाष्य
सिराजच्या नवीन घरी आख्ख्या आरसीबी टीमने लावली हजेरी, ‘हैदराबादी बिर्याणी’चाही लुटला आनंद; पाहा फोटो