---Advertisement---

कोण मिळवणार प्ले ऑफ्सचे तिकीट? लखनऊ-मुंबईमध्ये रंगणार काट्याची लढत

On: मंगळवार, मे 16, 2023 9:19 AM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (16 मे) अत्यंत महत्त्वाचा तसेच प्रतिष्ठेचा सामना खेळला जाणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी झुंज देत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान हा सामना लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर होईल. या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ्सच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील.

चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान ही थेट लढत होईल. हा सामना जिंकून मुंबई 16 गुणांसह प्ले ऑफ्सच्या उंबरठ्यावर पोहचेल. तर, मुंबईला पराभूत केल्यानंतर अखेरच्या सामन्यातही विजय मिळवून प्ले ऑफ्सचे तिकीट पक्के करण्याचा लखनऊचा प्रयत्न असणार आहे.

इकाना स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात चाहत्यांना फार मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. या मैदानावर आत्तापर्यंत कमी धावसंख्येचे सामने चांगलेच रंगतदार झाले आहेत. अशात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा आपल्या दमदार फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याने मागील सामन्यात दाखवलेला फॉर्म तसेच सूर्यकुमार यादव व नेहल वढेरा यांचे सातत्य निर्णायक ठरेल. तसेच गोलंदाजीत अनुभवी पियुष चावला याच्याकडून संघाला पुन्हा एकदा दमदार कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.

दुसऱ्या बाजूला लखनऊने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निर्णायक विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले होते. क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन हे विदेशी खेळाडू लखनऊ संघाची मुख्य ताकद आहेत. मागील सामन्यात प्रेरक मंकड याने देखील उत्कृष्ट खेळ दाखवला होता. गोलंदाजीवर लखनऊची मदार पूर्णपणे भारतीय खेळाडूंवर असेल.

उभय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

लखनऊ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

(IPL 2023 Lucknow Supergiants And Mumbai Indians Fight For Ticket To Play Offs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू 
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---