सध्या आयपीएल 2023च्या तयारीला वेग आला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाचा लिलाव 23 डिसेंबरला होणार आहे. या लिलावात एकूण 991 खेळाडूंनी नोंद केली. ज्यात 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंवर कोचीन या ठिकाणी होणाऱ्या आयपीएल 2023च्या लिलावात बोली लागणार आहे. ज्या 991 खेळाडूंनी नोंद केली आहे, त्यापैकी 185 खेळाडू हे कॅप्ड आहेत, तर 786 खेळाडू अनकॅप्ड आहेत आणि संलंग्न देशाचे 20 खेळाडू सामील आहेत.
आयपीएल लिलावाच्या आधी 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व 10 संघानी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे जमा केली आहे. आयपीएल 2023च्या लिलावात 10 कॅप्ड भारतीय खेळाडू आणि 166 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभाग घेणार आहेत. तसेच सलंग्न देशाचे 20 खेळाडू लिलावात भाग घेणार आहेत.
IPL 2023 लिलाव
कॅप्ड भारतीय खेळाडू- 19
कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू- 166
संलंग्न देशाचे खेळाडू-20
अनकॅप्ड भारतीय खेळाडू जे मागच्या हंगामाचा भाग होते- 91
अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू जे मागच्या हंगामाचा भाग होते-3
अनकॅप्ड भारतीय- 604
अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू-88
लिलावात भाग घेणार 14 देशांचे 277 खेळाडू
अफगणिस्तान-14
ऑस्ट्रेलिया- 57
इंग्लंड-31
आयर्लंड-8
नामिबिया-5
नेदरलॅंड्स- 7
न्यूझीलंड- 27
स्कॉटलंड- 2
दक्षिण आफ्रिका-52
श्रीलंका – 23
संयुक्त अरब अमिरात-6
वेस्ट इंडिज- 33
झिम्बाब्वे- 6
आयपीएल स्पर्धेचे आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक 5 वेळा ही स्पर्धा जिंकली, तर त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला. (IPL 2023 mini Auction is going to take place on 23 december in Coachin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना, ‘असे’ आहे वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
‘आम्ही खूप भावूक होतो, आम्हाला त्यांना घरच्या मैदानावर खेळताना बघायचे होते’ – मुंबई सिटी एफसीचे चाहते