इंडियन प्रीमियर लीग 2023चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंततराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा देखील मुळचा हैदराबादचा असल्याने त्याला या मैदानावर अधिक फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान, तिलकने सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आपल्या घरी जेवणासाठी नेले. यावेळी दिग्गज सचिन तेंडुलकर देखील संघासोबत होता.
मुंबई इंडियन्स संघातील सर्व सदस्यांना आपल्या घरी घेऊन गेल्यानंतर तिलक वर्मा (Tilak Verma) स्वतः आणि त्याचे कुटुंबीय खूपच आनंदात दिसले. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याने जेवणानंतरचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर, संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन यांच्यासह इतर खेळाडू आणि स्टाफ देखील आहे. तिलकच्या कुटुंबियांसोबत सर्वांनी फोटोसाठी पोज दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिलक वर्माने लिहिले की, “मुंबई इंडियन्स कुटुंबाला माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्याचा आभिमान आहे. एक अप्रतिम रात्र, जी माझे कुटुंब कधीच विसरू शकणार नाही. घरी येण्यासाठी धन्यवाद.”
Honoured to host my @mipaltan family at my home for dinner. A wonderful night that my family and I won’t forget. Thank you for coming ☺️💙 pic.twitter.com/LaBilbnrFS
— Tilak Varma (@TilakV9) April 17, 2023
दरम्यान, मुंबई इंडियन्ससोबत तिलक वर्मा यावर्षी आपला दुसरा आयपीएल हंगाम खेळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्याची बॅट अधिक तळपताना दिसत आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हैदराबादमध्ये खेळत आहे. तिलकसाठी हे घरचे मैदान असल्यामुळे तो याठिकाणी खेळण्यासाठी अधिक उत्सुक असू शकतो. चालू आयपीएल हंगामात तिलकने आतापर्यंतच्या चार सामन्यात मुंबईसाठी सर्वाधिक 177 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 59 धावांची राहिली आहे. या धावा त्याने 150च्या स्ट्राईख रेटने केल्या आहेत. मंगळवारी (18 एप्रिल) त्याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असेल. (IPL 2023 Mumbai Indians at Tilak Verma’s House)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त एका सामन्यानंतर अर्जुनला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता? हैदराबादविरूद्ध ‘हा’ खेळाडू घेणार जागा
आयपीएल इतिहासात 1000पेक्षा जास्त सिक्स मारणारे 7 संघ, RCB दुसऱ्या, तर पहिल्या स्थानी ‘ही’ टीम